नाद खुळा, नोकरीवर येणार गदा, झेडपी अधिकाऱ्यांचा कुटाणा, उघड झाला रात्रीचा फुटाणा

जिल्हा परिषदेतील एका विभागात प्रभारी म्हणून हे अधिकारी काम करत होते. ते नुकतेच एका तालुक्याच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांच्यासोबत कार्यालयातील काही सहकारीदेखील होते. कामकाज आटोपल्यानंतर ते नगरकडे परत येत असताना, त्यांना छमछम पाहण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे ऑन ड्युटी त्यांची पावले छमछमकडे वळल्याचं सांगितलं जातं.

कुणाला, कशाचा नाद असेल सांगता येत नाही. आपल्या नादापायी वेडी झालेली अनेक माणसं आजूबाजूला दिसतात. हा नाद वैयक्तिक पातळी ओलांडून जेव्हा तुमच्या कर्तव्यावर हावी होऊ लागतो, तेव्हा मात्र पंचाईत होते.

अशीच पंचाईत झाली अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची. एका तालुक्यात ते दौर्‍यावर गेले होते. मात्र तिथे त्यांनी दौऱ्यातील कामाव्यतिरिक्त थेट छमछम गाठत ताल देखील धरला. त्यांचा रात्रीचा हा प्रकार कोणाच्यातरी कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालेला हा प्रकार बघता बघता व्हायरल झाला आणि हा प्रकार अधिकार्‍यांच्या चांगलाच अंगलट आला.

जिल्हा परिषदेतील एका विभागात प्रभारी म्हणून हे अधिकारी काम करत होते. ते नुकतेच एका तालुक्याच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांच्यासोबत कार्यालयातील काही सहकारीदेखील होते. कामकाज आटोपल्यानंतर ते नगरकडे परत येत असताना, त्यांना छमछम पाहण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे ऑन ड्युटी त्यांची पावले छमछमकडे वळल्याचं सांगितलं जातं.

ठेका धरलेल्या अवस्थेतले त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि याची गंभीर दखल घेत प्रशासनाने त्यांच्याकडील प्रभारी पदभार काढून घेतला. या सगळ्या प्रकाराची प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. गुप्त पद्धतीने ही चौकशी सुरू असल्याचे सांगितले जाते. तर आपण ठेका धरलेला असताना आपले फोटो कुणी काढले याचा शोध अधिकारी आणि कर्मचारी घेत आहेत.