अजितदादा@६१

#HappyBirthdayAjitPawarवेळेच्या पुढे विचार करणारा नेता अजित दादा
दादा बोलायला वागायला अनेकांना कडक वाटतात. तडक फडक ते बोलतातही. कुणाला तोडूनही बोलतात. पण मनातून त्यांना कार्यकर्त्यांच्या कामाची तळमळ अतिशय असते, हेही मी जवळून पाहिले आहे. ते एखादा शब्द कटू बोलतील, पण त्या कार्यकर्त्यांचे काम लक्षात ठेवून करूनही देतील, असा त्यांचा स्वभाव आहे. त्यांना कोणत्याही प्रकारच्या कृत्रिमतेचा, अति औपचारिकतेचा राग आहे. फक्त कामाची व जनहिताची तळमळ आहे.