तटकरेंना द्यावा लागलेला मंत्री पदाचा राजिनामा आणि दादांनी दिलेला आधार, खा. तटकरेंनी सांगीतला भावनीक किस्सा

दादा एक उत्तम रसिक आहेत. कला, साहित्य आणि खेळ यावर दादांचे प्रेम आहे. कबड्डी, खोखो सह राज्य ऑलिम्पिक संघटनेला दादांनी कायम प्रोत्साहन दिले आहे. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये बुवा साळवी यांच्या आग्रहाखातर दादांनी कबड्डी असोशिएशनचे दिमाखदार कार्यालय उभे केले. संस्था उभ्या करून त्या अत्यंत कार्यक्षमपणे काम करतील यावर दादांचा कटाक्ष असतो. केवळ भूमिपूजन अन् उद्घाटने करून दादा थांबत नाहीत, तर त्या सर्व संस्था जनताभिमुख होवून सर्वसामान्यांना लाभदायक कशा ठरतील यावर ते बारकाईने लक्ष देतात.

  दादा एक उत्तम रसिक आहेत. कला, साहित्य आणि खेळ यावर दादांचे प्रेम आहे. कबड्डी, खोखो सह राज्य ऑलिम्पिक संघटनेला दादांनी कायम प्रोत्साहन दिले आहे. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये बुवा साळवी यांच्या आग्रहाखातर दादांनी कबड्डी असोशिएशनचे दिमाखदार कार्यालय उभे केले. संस्था उभ्या करून त्या अत्यंत कार्यक्षमपणे काम करतील यावर दादांचा कटाक्ष असतो. केवळ भूमिपूजन अन् उद्घाटने करून दादा थांबत नाहीत, तर त्या सर्व संस्था जनताभिमुख होवून सर्वसामान्यांना लाभदायक कशा ठरतील यावर ते बारकाईने लक्ष देतात.

  अजितदादा.. अर्थात राज्याच्या राजकारणातील हुकमी नेता, उमदा कार्यकर्ता, कठोर प्रशासक म्हणून राज्यातील जनतेला परिचित आहेत. मला मात्र ते एक लोकनेता अन जिंदादिल म्हणून कायमच भावतात. गेली ३० वर्षे अजितदादा अन् माझी मैत्री आहे. जिवाभावाचे आमचे ॠणानुबंध आहेत. शरद पवार यांच्या मुशीत तयार झालेले हे नेतृत्व महाराष्ट्राच्या विकासाचा मजबूत विचार तर आहेच. पण त्यांनी केलेल्या अनेक सर्वोत्तम कामांमुळे अजितदादा म्हणजे विकासाच्या प्रति विचार, आचार आणि संस्कार आहे. कोणतेही चांगले काम असो, दादा राजकीय पक्ष, हेवेदावे, विरोधक असा भेद करत नाहीत हे मी ३० वर्षांपासून पहात आलोय.

  तो काळ १९९२-९३ चा होता. मी जिल्हा परिषदेत सक्रिय होतो. दादा पहिल्यांदाच सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाले होते. जिल्हा परिषदेच्या कामानिमित्त मी तेव्हा मंत्रालयात जात असे. त्यावेळी दादांची भेट झाली. आम्ही दोघेही तरूण कार्यकर्ते. पहिल्याच भेटीत त्यांच्या कामाच्या पध्दतीने मी प्रभावित झालो. पहिल्यांदाच मंत्री असूनही विषयांची संपूर्ण जाणिव, माहिती आणि धोरणात्मक भूमिका त्यांच्याकडे होती. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात लोकाभिमुखता हवी असा संस्कार त्यांच्यावर ऐन युवा वयातच खोलवर रुजलेला पाहिला. त्यामुळे मी दादांच्या नेतृत्वाने भारावलो. त्यांच्यासारखा कामाचा वकुब आपणांकडेही असावा असा निर्धार करून सार्वजनिक जीवनात कामाला लागलो. आमची मैत्री बहरत गेली.

  अत्यंत कठोर शिस्त आणि सडेतोड व्यक्तिमत्व म्हणून दादांची ओळख आहे. पण त्यापलीकडे दादा एक भावनिक अन् हळवे आहेत. कुटूंबवत्सल आहेत. राजकारणात कार्यकर्त्यांना कायम सन्मान देताना त्यांची काळजी करणारे दादा एक आधार वाटतात. एकदा मैत्र झाले की दादा ते कायम निभावतात. हा त्यांचा स्वभावगुण अनेकांना माहित नाही. तसेच दादा एक उत्तम रसिक आहेत. कला, साहित्य आणि खेळ यावर दादांचे प्रेम आहे. कबड्डी, खोखो सह राज्य ऑलिम्पिक संघटनेला दादांनी कायम प्रोत्साहन दिले आहे. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये बुवा साळवी यांच्या आग्रहाखातर दादांनी कबड्डी असोशिएशनचे दिमाखदार कार्यालय उभे केले. संस्था उभ्या करून त्या अत्यंत कार्यक्षमपणे काम करतील यावर दादांचा कटाक्ष असतो. केवळ भूमिपूजन अन् उद्घाटने करून दादा थांबत नाहीत, तर त्या सर्व संस्था जनताभिमुख होवून सर्वसामान्यांना लाभदायक कशा ठरतील यावर ते बारकाईने लक्ष देतात.

  दादा म्हणजे नाविन्यपूर्ण विकासाचे एक मॉडेल आहे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बारामती असो किंवा पुणे आणि पिंपरी चिंचवड… या शहरांची स्मार्टसिटीच्या रुपात उभारणी करून दादांनी विकासाची दिशा घालून दिली आहे. खरेतर दादा हे पुणे अन् पिंपरी चिंचवड शहरांचे आधुनिक शिल्पकार आहेत.

  दादांचा हा प्रशासकीय गुण खुप मोठा आहे. त्याला विकासाची दिशा आहे. तसेच क्रिकेटचे ते अत्यंत चाहते आहेत. मी पण क्रिकेटचा चाहता आहे. जगभरातील दिग्गज खेळाडू, त्यांची क्रिकेटमधली कारकिर्द एवढेच दादांना माहित आहे असे नाही, तर कोणत्या मैदानावर चेंडू कसे उसळतात, वळतात याचीही त्यांना उत्तम जाणीव आहे. एक चतुरस्र व्यक्तीमत्व म्हणून दादांची कारकिर्द महाराष्ट्रात जशी लोकप्रिय आहे, अगदी तशीच ती दिल्लीतील राजकीय वर्तुळातदेखील आहे. मी खासदार म्हणून दिल्लीत काम करत असताना देशातील अनेक राज्यातील दिग्गज नेते दादांबद्दल आदराने बोलतात. त्यांच्या कामाच्या पध्दतीचे कौतुक करतात. हे ऐकताना एक मित्र म्हणून मला दादांचाकायम अभिमान वाटतो.

  राजकारणात मी जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, मंत्री, राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष आणि खासदार झालो. या माझ्या सर्व चढउतारांमध्ये दादांचे मोठे योगदान तर आहेच. पण कठीण प्रसंगी आधारदेखील आहे. मला आठवतेय २००२ मध्ये रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या पदावरून वाद निर्माण झाल्यामुळे माझा राज्य मंत्रीपदाचा राजीनामा घेतला. तेव्हा माझ्या घरी येवून आधार देणारे दादा हे पहिले नेते होते.

  एक नेता म्हणून दादांबद्दल जेवढा आदर आहे तेवढाच आदर एक मित्र म्हणून आहे. या महाराष्ट्राला एका शिस्तप्रिय प्रशासनासोबतच उद्योगशील आणि प्रगतीशील करण्याची दादांची भूमिका निर्विवाद आहे.

  आज ते ६१ वर्षांचे होत आहेत. त्यांनी वयाच्या २०-२५ वर्षी समाज जीवनात स्वतःला वाहून घेतले. तेव्हापासून ते आजपर्यंत दादांचा दिनक्रम बदललेला नाही. सकाळी सहा वाजता ते कामाला लागतात. सतत कार्यकर्त्यांमध्ये रमणारे अन् त्यांच्याकडून जनहिताची कामे करवून घेणारे दादा एक ऊर्जास्रोत आहेत. त्यांच्या वाढदिवशी एकचं प्रार्थना करतो की, ” दादा तुम्हाला निरोगी आरोग्य लाभो. या राज्यातील जनतेच्या हिताची तुम्ही घेतलेली धुरा कायम मजबूत राहो. माझ्या या नेत्याला अन जिंदादिल मित्राला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…!

  सुनिल तटकरे

  खासदार, रायगड लोकसभा