‘सरळमार्गी, मनमोकळा नेता अजितदादा’ अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण छगन भुजबळ यांनी अजित पवारांचे मानले आभार

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आमच्या सरकारपुढे अनेक संकटे आली. त्यात सर्वात मोठे संकट हे कोरोनाचे आहे. जे संपूर्ण जगावर घोंघावत आहे आणि अजूनही संपलेले नाही. त्याचबरोबर अवकाळी पाऊस, निसर्ग चक्रीवादळे, अतिवृष्टी अशी अनेक संकटे मधल्या काळात आली. पण मुळातच जनतेचे कल्याण या उदिष्टाने एकत्र आलेल्या आमच्या महाविकास आघाडी सरकारने सर्व संकटांशी दोन हात केले. या सर्वात राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी कोणत्याही विभागाचा अर्थपुरवठा थांबवला नाही. राज्याचे अर्थचक्र चालू राहावे, यासाठी सातत्याने प्रयत्न करताना त्यांनी राज्याच्या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य दिले.

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आमच्या सरकारपुढे अनेक संकटे आली. त्यात सर्वात मोठे संकट हे कोरोनाचे आहे. जे संपूर्ण जगावर घोंघावत आहे आणि अजूनही संपलेले नाही. त्याचबरोबर अवकाळी पाऊस, निसर्ग चक्रीवादळे, अतिवृष्टी अशी अनेक संकटे मधल्या काळात आली. पण मुळातच जनतेचे कल्याण या उदिष्टाने एकत्र आलेल्या आमच्या महाविकास आघाडी सरकारने सर्व संकटांशी दोन हात केले. या सर्वात राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी कोणत्याही विभागाचा अर्थपुरवठा थांबवला नाही. राज्याचे अर्थचक्र चालू राहावे, यासाठी सातत्याने प्रयत्न करताना त्यांनी राज्याच्या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य दिले.

  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस. दादांचे नाव माहीत नाही, असा एकही माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेहमीच दादांच्या करारी बाण्याचे कौतुक होत असते. अजितदादांचा प्रशासनातील वचक आणि काम करण्याच्या पद्धतीचे अगदी त्यांचे विरोधकसुद्धा कौतुक करतात.

  शरद पवार यांच्यासारख्या मात्तब्बर नेत्याच्या मुशीत तयार झालेल्या अजितदादांचा स्व:ताचा असा कार्य लौकिक आहे. शरद पवार हे लोकसभेत असताना संपूर्ण बारामती आणि महाराष्ट्राची जबाबदारी दादांनी सांभाळली. दादांच्या विकासकामांवर बारामतीच्या जनतेने विश्वास ठेवला आणि बारामती मतदारसंघातून विधानसभेवर १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४, २०१९ मध्ये आमदार म्हणून त्यांना निवडून पाठवले. सुधाकरराव नाईक यांच्या सरकारमध्ये ते शेती आणि उर्जामंत्रीही होते. शरद पवार हे मुख्यमंत्री झाल्यानंतरही ते मंत्रीमंडळात मंत्री होते. त्यानंतर आमच्या आघाडीचे सरकार असताना म्हणजे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्येही अजित पवार यांनी विविध मंत्रीपदे भुषवली. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दादा राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून कामांचा सपाटा सुरू केला. दादांचा स्वभाव हा अतिशय सरळमार्गी आणि मनमोकळा आहे. प्रशासनावर उत्तम पकड असलेल्या दादांचा जनसामान्यांमध्ये मोठा नावलौकिक आहे. त्यांच्य़ा स्पष्टोक्तेपणाची देखील नेहमीच चर्चा होत असते. काम होत असेल तर तिथल्या तिथे सोक्ष-मोक्ष. पण काम होणार नसेल तर नाही म्हणून स्पष्टपणे सांगणे, अशी अजित पवारांची ख्याती आहे.

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आमच्या सरकारपुढे अनेक संकटे आली. त्यात सर्वात मोठे संकट हे कोरोनाचे आहे. जे संपूर्ण जगावर घोंघावत आहे आणि अजूनही संपलेले नाही. त्याचबरोबर अवकाळी पाऊस, निसर्ग चक्रीवादळे, अतिवृष्टी अशी अनेक संकटे मधल्या काळात आली. पण मुळातच जनतेचे कल्याण या उदिष्टाने एकत्र आलेल्या आमच्या महाविकास आघाडी सरकारने सर्व संकटांशी दोन हात केले. या सर्वात राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी कोणत्याही विभागाचा अर्थपुरवठा थांबवला नाही. राज्याचे अर्थचक्र चालू राहावे यासाठी सातत्याने प्रयत्न करताना त्यांनी राज्याच्या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य दिले.

  कोरोनाचा मुकाबला करताना राज्याची आरोग्य व्यवस्था आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्याच्या अर्थसंकल्पात त्यांनी आरोग्य विभागासाठी भरीव तरतूद केली. त्यामुळेच आपण राज्यातील सर्वच जिल्ह्यात कोरोनाशी लढण्यासाठी सक्षम यंत्रणा तयार करू शकलो.

  कोरोना संकटामुळे सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडल्याने आर्थिक वर्षात विकासकामांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीला कात्री लागण्याची शक्यता होती. तरीही उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी निधी वितरित करताना नाशिक जिल्ह्यासाठी हात काहीसा सैल सोडला आणि नाशिक जिल्ह्याला भरघोस निधी दिला. शासनाने ‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत प्रतिबंधाच्या काळात आर्थिक दुर्बल घटकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देण्यासाठी ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. प्रतिबंधाच्या कालावधीत गोरगरिबांना शिवभोजन थाळी मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला आहे. राज्यातील सुमारे ७ कोटी लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती तीन किलो गहू,  दोन किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मोफत शिवभोजन थाळीचा निर्णय तर सर्व सामान्य जनतेला मोठा दिलासा देणारा ठरतो आहे. त्यासाठी देखील अजित पवार यांनी भरघोस निधी देण्याची तयारी दाखवली.

  एखादे लोककल्याणकारी काम जर दादांना सुचले तर त्या कामाला पुर्णत्वास नेल्याशिवाय ते शांत बसत नाहीत, याचा मला अनुभव आहे. अजितदादा राज्याचे ऊर्जामंत्री असताना, महावितरणमध्ये ‘लाईनवूमन’ म्हणून महिलांना संधी देण्याचा क्रांतीकारी निर्णय त्यांनी घेतला. त्यावेळी भरती केलेल्या मुली, लाईनवुमन म्हणून आज मुलांपेक्षाही चांगले काम करत आहेत.

  आपला महाराष्ट्र आज देशातीलच नव्हे तर जगातील आघाडीच्या राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्राची महाविकास आघाडी सर्वसमावेशक आहे. ती केवळ पायाभूत सुविधांच्या निर्मितीपुरती मर्यादित नाही, तर पुरोगामी विचारधारा, सामाजिक सुधारणा तसेच राज्य शासनाच्या क्रांतिकारी निर्णयांमध्ये ही महाविकास आघाडी ठळकपणे दिसते. अनेक महापुरुषांनी, संत-महात्म्यांनी इथल्या मातीत रुजवलेल्या पुरोगामी आणि प्रगतशील विचारांमधून प्रेरणा घेऊन महाविकास आघाडी शासन काम करत आहे.  या महाविकास आघाडीचे शिलेदार म्हणजेच उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा काम करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. अजित पवार हे ६२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. मात्र दादांकडे पाहून ते ६२ वर्षांचे आहेत असे कोणाला पटणारही नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी सतत धडपड करणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपले सर्वांचे अजितदादा यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा आणि त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.

  छगन भुजबळ

  मंत्री, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य

  पालकमंत्री नाशिक जिल्हा