हिवरखेड येथे वन अधिका-यांकडून अटक करण्यात आलेले शिकारी आणि जप्त करण्यात आलेली बंदूक
हिवरखेड येथे वन अधिका-यांकडून अटक करण्यात आलेले शिकारी आणि जप्त करण्यात आलेली बंदूक

अकोट (Aakot) : अकोला जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत हिवरखेड येथे वन अधिका-यांकडून करण्यात आलेल्या केलेल्या कारवाईमध्ये पक्ष्यांची शिकार करणा-या तिघांना अटक करण्यात आली. अकोट वन्यजीव विभागाच्या फिरत्या पथकाला काही व्यक्ती पक्ष्यांची शिकार करुन वाहनातून नेत असल्याची माहिती मिळाल्याने अकोट-तेल्हारा टी-पॉइंट दरम्यान ओमशक्ती ढाब्याजवळ सापळा रचला.

पथकाने एमएच-12 एमडब्ल्यू-8412 क्रमांकाच्या वाहनाची झडती घेतली असताना वाहन चालकासह दोन व्यक्ती आढळल्या. त्यांची विचारपूस केली असता महंमद फैजल महंद इस्माईल, इम्तियाज अहमद निजामोद्दिन अहमद आणि महंमद इम्रान महंमद उस्मान रा. मालेगाव अशी सांगितली. आरोपींकडून 7 रातवा पक्षी, 1 कबूतर, 2 पारवा हे मृतावस्थेतील पक्षी जप्त केले. आरोपींकडे 1 एअरगन, 25 छर्रे, 1 चाकू व बॅटरी आढळली. आरोपींनी 18 ऑक्टोबरला झरी वर्तुळात गुन्हा केल्याची कबुली दिली. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली.

तपास वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण हे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी, उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे. या कारवाईमध्ये सहायक वनसंरक्षक लक्ष्मण आवारे, वनपरिक्षेत्र अधिकारी पी. डी. पाटील, एम. सी. ठाकूर, एम. बी. अंभोरे, सरजू भारती सहभागी होते.