अकोल्यात आणखी १२ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

अकोला – अकोला जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. आज सकाळी अकोला जिल्ह्यात १२ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये बारगणपुरा येथील ३ रूग्ण, बोरगाव मंजू येथे ३ जण आणि रामनगर परिसरात २ रूग्णांचा समावेश आहे. तसेच यामध्ये पाच महिला आणि सात पुरूषांचा देखील समावेश आहे. 

अकोला जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढली असता, एकूण कोरोना बाधितांचा आकडा २ हजार १८४ पर्यंत पोहोचला आहे. तर १०३ जणांचा बळी गेला आहे. त्याचप्रमाणे १ हजार ७५४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

काल सोमवारी रॅपिड ॲन्टीजेन टेस्टमध्ये ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. परंतु आतापर्यंतची स्थिती पाहता, ३२६ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.