Corona-Positive-patient

अकोला (Akola) : आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 159 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 146 अहवाल निगेटीव्ह तर 13 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज एक मयत झाले. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7808 झाली आहे. आज दिवसभरात 77 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

  • रॅपिड अँटीजन टेस्टमधे रविवारी दिवसभरात १११ चाचण्या, ९ पॉझिटिव्ह

अकोला (Akola) : आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 159 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 146 अहवाल निगेटीव्ह तर 13 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज एक मयत झाले. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7808 झाली आहे. आज दिवसभरात 77 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 40,431 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 39,405 फेरतपासणीचे 208 तर वैद्यकीय कर्मचा-यांचे 818 नमुने होते. आजपर्यंत एकूण 40,409 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 34,069 तर पॉझिटीव्ह अहवाल 7808 आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज १३ पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 7 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात 4 महिला व 9 पुरुष आहेत. त्यातील पैलवाडा येथील दोन जण, तर उर्वरित निंबा, भीम नगर, गजानन नगर, खडकी, केशव नगर, किसरा कॉलनी, बाळापूर, वाल्मिकी नगर, बाळापूर नाका, कापसी ता. पातूर व जिएमसी क्वॉटर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

७७ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 19 जणांना, ओझोन हॉस्पीटल येथून एक जण, अकोला अॅक्सीडेंट क्लिनिक येथून एक जण, सुर्याचंद्रा हॉस्पीटल येथून एक जण तर हॉटेल रिजेन्सी येथून एक जणांना, तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले 54 जण, अशा एकूण 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

उपचारा दरम्यान रविवारी एकाचा मृत्यू
दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण मुंडगाव, ता. अकोट येथील ७८ वर्षीय पुरुष असून ते ५ ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा आज उपचार घेताना मृत्यू झाला.

५०६ रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 7,808 आहे. त्यातील 255 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 7,047 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 506 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे. रॅपिड अँटीजन टेस्ट आज दिवसभरात 111 चाचण्या, 9 पॉझिटिव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड अँटीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 111 चाचण्या झाल्या त्यात 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, अकोट, पातूर, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही. तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 33 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, 45 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 28 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर हेडगेवार लॅब्‍ येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे दिवसभरात 111 चाचण्यांमध्ये नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 18,940 चाचण्या झाल्या त्यात 1,367 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.