प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

  • १ आरोपी फरार

अकोट (जि.अकोला) (Akola). अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी अकोट तालुक्यातील अडगाव खुर्द येथील गांजा जप्ती प्रकरणी २ आरोपींना १२ ऑक्टोबर २०२० पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आरोपी राजू सोळंके आणि वारी येथील कैलास पवार अशी आरोपींची नावे आहेत.

अडगाव खुर्द येथील आरोपी राजू सोळंके याच्या घरातून ३९ किलो गांजा केला होता. त्यामुळे दोघांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. एक आरोपी अजूनही फरार आहे. या प्रकरणात तेल्हारा तालुक्यातील बोरव्हा येथील शत्रुघ्न चव्हाण याच्या घरातून १०७ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला होता; परंतु आरोपी फरार झाला. या प्रकरणी सरकारी वकील अजित देशमुख यांनी सरकारतर्फे युक्तिवाद केला. या परिसरातून लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा देखील पोलिसांनी अशातच जप्त केला होता आणि आता अंमली पदार्थांचा साठा जप्त केल्याने या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार कोण ? असा प्रश्न अकोट तालुक्यात उपस्थित होत आहे.