अकोला जिल्ह्यात आज २० पॉझिटीव्ह, तर एक मृत

  • उपचारानंतर १९० जणांना डिस्चार्ज -रॅपिड ॲन्टीजन टेस्ट मधे आज दिवसभरात ६५ चाचण्या,
  • ३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

अकोला (Akola).  आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाचवाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १७२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १५२ अहवाल निगेटीव्ह तर २० अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज एक मयत झाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ४०, २७८ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  ३९,२२८ फेरतपासणीचे २०८ तर वैद्यकीय कर्मचा-यांचे ८१२ नमुने होते. आजपर्यंत एकूण ४०२५० अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३३९२३ तर पॉझिटीव्ह अहवाल  ७७९२ आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज २० पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात ७ जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी १८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात ६ महिला व १२ पुरुष आहेत. त्यातील मूर्तिजापूर व टॉवर चौक येथील प्रत्येकी तीन जण, तर उर्वरित सिंधी कॅम्प, आलेगाव ता. पातूर, जठारपेठ, वर्धमान नगर, खंडाळा बाळापूर, बोरगाव मंजू, रवी नगर, आरटीओ ऑफिस जवळ, पिंपळखुटा, वाशिम बायपास, खडकी व हनुमान वस्ती येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी २ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला व एक पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तुकाराम चौक व अनसुया नगर शिवर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये १२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

१९० जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १३ जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून ५ जण, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून ६ जण, आयकॉन हॉस्पीटल येथून २ जण, ओझोन हॉस्पीटल येथून ३ जण, युनिक हॉस्पीटल येथून २ जण, अकोला ॲक्सीडेंट क्लिनिक येथून २ जण, आयुर्वेदीक हॉस्पीटल येथून २ जण, हॉटेल रिजेन्सी येथून १ जण, तर हॉटेल स्कायलार्क येथील ९ जणांना, तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले १४५ जणांना, अशा एकूण १९० जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे.

उपचारा दरम्यान आज एकाचा मृत्यू ; ५६८ रुग्णांवर उपचार सुरू
दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण देवीकर आखाडा, जठारपेठ येथील ५५ वर्षीय महिला असून ती दि. ९ ऑक्टोम्बर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला.  आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ७७९२ आहे. त्यातील २५४ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची ६९७० संख्या  आहे. तर सद्यस्थितीत ५६८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात ६५ चाचण्या, ३ पॉझिटिव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या ६५ चाचण्या झाल्या. त्यात ३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- 
अकोला ग्रामिण, अकोट, पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही. बाळापूर येथे ३ चाचण्या झाल्या. त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे एक चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. मुर्तिजापूर येथे २ चाचण्या झाल्या. त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तसेच अकोला मनपा व अकोला आयएमए येथे चाचण्या झाल्या नाही. ३४ वैद्यकीय कर्मचा-यांच्या चाचण्या झाल्या. त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे २५ चाचण्या झाल्या त्यात २ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात ६५ चाचण्यांमध्ये ३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत १८८२९ चाचण्या झाल्या त्यात १३५८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.