४० वर्षे जुना वृक्ष उन्मळून पडला; कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केली पुर्नलागवड

वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीत उन्मळून पडलेल्या वृक्षांची पुनर्लागवड (to replant trees) करण्याचा प्रयत्न वृक्ष क्रांती मिशनतर्फे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात यशस्वी करण्यात आला. याबाबत वृक्ष क्रांती मिशनचे (Tree Revolution Mission) अध्यक्ष नाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी विद्यापीठाच्या (the Agricultural University) आवारात वादळाने अंदाजे ४० वर्षे वयाचा मंकी ट्री (काजनास पिन्नात) या जातीचा वृक्ष उन्मळून पडला.

  अकोला (Akola). वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीत उन्मळून पडलेल्या वृक्षांची पुनर्लागवड (to replant trees) करण्याचा प्रयत्न वृक्ष क्रांती मिशनतर्फे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात (Punjabrao Deshmukh Agricultural University) यशस्वी करण्यात आला. याबाबत वृक्ष क्रांती मिशनचे (Tree Revolution Mission) अध्यक्ष नाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी विद्यापीठाच्या (the Agricultural University) आवारात वादळाने अंदाजे ४० वर्षे वयाचा मंकी ट्री (काजनास पिन्नात) या जातीचा वृक्ष उन्मळून पडला. याबाबत माहिती डॉ. संजय भोयर यांनी दिली.

  त्यानुसार नाथन, डॉ. माने, डॉ. हर्षवर्धन देशमुख, डॉ. एस. एस. हर्णे यांनी पडलेल्या झाडाची पाहणी केली व झाड कोठे स्थलांतरित करून लावायचे ते ठिकाण ठरविण्यात आले. वृक्ष उचलून नेण्यासाठी क्रेन व जेसीबी यंत्राची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनात खड्डा खोदून, त्यात चांगली माती, पालापाचोळा, ट्रायकोडर्मा बुरशी नाशक, सुडोमोनास याचे कल्चर मातीत मिसळून एक फुटाचा चांगल्या मातीचा थर केला.

  त्यानंतर शास्त्रीय पद्धतीने झाडाच्या एक चतुर्थांश फांद्यांची छाटणी करण्यात आली व नंतर क्रेनच्या साहाय्याने पूर्ण झाड काळजीपूर्वक उचलून सरळ उभे करून खड्ड्यात ठेवण्यात आले. त्यानंतर झाडाच्या तुटलेल्या मुळांना बुरशी लागू नये म्हणून बाविस्टीन पाण्यात मिसळून ते मिश्रण झाडाच्या तुटलेल्या मुळांना लावण्यात आले. त्यानंतर बुरशीनाशक मिश्रित माती खड्ड्यात टाकून खड्डा भरण्यात आला. झाड मजबुतीने उभे राहावे म्हणून झाडाच्या बुंध्यापाशी, मातीचा भर देण्यात आला. नंतर झाडाभोवती भरखते व पाणी देण्याच्या हेतूने मोठे आळे करण्यात आले व नंतर झाडाला टँकरने भरपूर पाणी देण्यात आले.

  तसेच मुळांची वाढ चांगली व्हावी, म्हणून ह्यूमिक ॲसिड पाण्यात मिसळून रिंग पद्धतीने ड्रेंचिंग करण्यात आले, सोबतच झाडाला नवीन पालवी फुटावी म्हणून सिंगल सुपर फोस्फटचा डोस मातीत मिसळून टाकण्यात आला. झाडाची ही पुनर्लागवड करण्यात कृषी विद्यापीठ येथील शास्त्रज्ञ डॉ. सुधीर वडतकर, डॉ. शामसुंदर माने, डॉ. ययाती तायडे, डॉ. हर्षवर्धन देशमुख, डॉ. संजय कोकाटे यांचे तांत्रिक साहाय्य लाभले. या उपक्रमासाठी वृक्ष क्रांती मिशनचे विद्याताई पवार, विजयकुमार गडलिंगे, गोविंद बलोदे, पांडे, तुंबडी, पृथ्वीराज चव्हाण व विशाखा निंगोत यांचे साहाय्य लाभले.

  तर वृक्ष क्रांती मिशनला संपर्क करा!
  अशा प्रकारे वादळाने वा अन्य कारणाने उन्मळून पडलेल्या वृक्षाचे तसेच विकासकामे वा अन्य कारणाने वृक्ष तोडावयाचा असल्यास वृक्ष उन्मळून पडल्यानंतर शक्य तितक्या लवकर व वृक्ष तोडावयाचा असल्यास त्या आधीच वृक्ष क्रांती मिशनच्या अकोला शहरातील आगरकर विद्यालयाच्या आवारातील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन नाथन यांनी केले आहे.