Corona-Virus-Latest-Update

अकोला (Akola): जिल्ह्यात आज शनिवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 184 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 158 अहवाल निगेटीव्ह तर 26 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्याच प्रमाणे काल (दि.23) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 11 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तसेच आज (दि.24) रोजी रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 5 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. ज्यामुळे कोरोना पॉझिटीव रुणांमधे 42 नवीन रुग्णांचा समावेश झाला आहे. आज दिवसभरात 15 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज २६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
दरम्यान आज दिवसभरात 26 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 17 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व 11 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मूर्तिजापूर येथील तीन जण, रुख्मिणी नगर येथील दोन जण, उर्वरीत बाळापूर, अकोट फाईल, लाडेगाव, मोठी उमरी, रेल्वे स्टेशन, रामदास पेठ, आर एस हॉस्टेल रेल्वे स्टेशन, गणेश नगर, आश्रय नगर, केळकर हॉस्पिटल, सुंदर नगर व शास्त्री नगर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. त्यातील काळे प्लॉट जठारपेठ येथील दोन जण, तर उर्वरित जीएमसी हॉस्टेल, जवाहर नगर, कौलखेड, जीएमसी क्वॉटर, तेल्हारा, साखरवीरा व रणपीसे नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 11 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.