corona

  • प्राप्त अहवाल- २१२, निगेटीव्ह- १४७

अकोला (Akola). आज सायंकाळी १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात २ महिला व १४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील प्रत्येकी ४ जण, जठारपेठ येथील २ जण, तर उर्वरित मुर्तिजापूर, खदान, डाबकी रोड, रेल्वे स्टेशन जवळ, शंकर नगर, जीएमसी हॉस्टेल, मलकापूर, मुर्तिजापूर रोड, चांदूर व गिता नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत. दरम्यान आज तिघांचे मृत्यू झाले. त्यात राजेश्वर कॉलनी येथील ५६ वर्षीय महिला असून ती ८ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला, वाडेगाव ता. बाळापूर येथील ६५ वर्षीय महिला असून ती १२ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला. तर मुर्तिजापूर येथील ६२ वर्षीय महिला असून ती १२ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला.

अकोल्यात आज दुपारनंतर उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून पाच जण, कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून १२ जण, कोविड केअर सेंटर, बाळापूर येथील चार जण, कोविड केअर सेंटर, अकोट येथून १० जणांना एकाचा अशा एकूण ३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

अकोल्यातील सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल – ५७९६, मयत-१८९, डिस्चार्ज- ४४०३ दाखल रुग्ण ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह- १२०४, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.