मूर्तिजापूरमध्ये अतिवृष्टीमुळे ९०० कोंबड्यांच्या पिल्लांचा पाण्यात बुडून मृत्यू,शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी

अकोला (Akola) जिल्हातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील (Murtijapur taluka) रविंद्र मोहिते यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी कुक्कुटपालनाचा व्यवसाय (poultry) सुरू केला. याकरिता कुरुम रेल्वे स्टेशन (Kurum railway station) लगत असलेल्या ......

    अकोला (Akola).  जिल्हातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील (Murtijapur taluka) रविंद्र मोहिते यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी कुक्कुटपालनाचा व्यवसाय (poultry) सुरू केला. याकरिता कुरुम रेल्वे स्टेशन (Kurum railway station) लगत असलेल्या शेतात पाच हजार पक्षी पालनासाठी टिन शेड उभे केले. कमिशन तत्वावर त्यांनी हा व्यवसाय सुरू केला.

    काल झालेल्या मुसळधार पावसाने शेताच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्याचे पाणी कुक्कुटपालन केंद्रात आत शिरल. त्यामुळे कोंबड्यांच्या 4 हजार 300 पिल्लांतील जवळपास 900 पिल्लं पाण्यात बुडून मरण पावली…व त्या सोबत पशुखाद्याच्या बॅग खराब झाल्यामुळे रवींद्र मोहिते यांचे जवळपास १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.