व्यासपीठावर भाषण सुरु असतानाच राष्ट्रवादीच्या आमदाराला अर्धांगवायूचा सौम्य झटका; आयसीयूमध्ये दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा सौम्य झटका आला आहे. एका कार्यक्रमात व्यासपीठावर भाषण करताना त्यांना अर्धांगवायूचा सौम्य झटका आला. मिटकरी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. हिंगणा येथे राष्ट्रवादीने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

    अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा सौम्य झटका आला आहे. एका कार्यक्रमात व्यासपीठावर भाषण करताना त्यांना अर्धांगवायूचा सौम्य झटका आला. मिटकरी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. हिंगणा येथे राष्ट्रवादीने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

    या कार्यक्रमात अमोल मिटकरी भाषण करत होते. स्टेजवर बोलत असताना अमोल मिटकरी यांचा आवाज अचानक बदलला आणि त्यांचे हावभाव बदलले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केलं.

    अमोल मिटकरी यांनी उपाचारनंतर स्वतःच प्रकृतीबाबत माहिती दिली. माझ्या प्रकृतीत सुधारणा झाली असून स्वतःचा जीव धोक्यात घालून मला भेटायला येऊ नका असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. प्रकृती उत्तम असून चिंता करण्याचे कारण नसल्याचेही मिटकरी यांनी म्हटलं आहे.