शेतात काम करताना अंगावर वीज कोसळून युवकाचा मृत्यू

अकोला तालुक्‍यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या आपोती खुर्द शेतशिवारात १६ वर्षीय युवकाच्या अंगावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी, १८ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली.

    बोरगाव मंजू (Borgaon Manju). अकोला तालुक्‍यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या आपोती खुर्द शेतशिवारात १६ वर्षीय युवकाच्या अंगावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी, १८ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. आदित्य आपोतीकर, असे मृतक युवकाचे नाव आहे.

    आपोती खुर्द शेतशिवारात सद्या होती अंतर्गत मश्ञागतीला वेग आला आहे. परिसरात निंदण, डवरणी आदी कामांत शेतकऱ्यासह मजूर व्यस्त आहेत. काही महिला मजूरासह आदित्य किसनराव आपोतीकर ( १६) हा निंदणच्या कामासाठी शेतात गेला होता. दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होत असल्याने मजूर शेतातून काम करूत घरी परतत होते. गाव काही हाकेच्या अंतरावर असतानाच अचानक विजेच्या कडकडाट झाला. आदित्यच्या अंगावर वीज कोसळल्याने तो गंभीर भाजला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

    घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आदित्यला शासकीय रुग्णालयात हलविले, परंतु नियतीने डाव साधला. सदर घटनेची माहिती बोरगाव मंजू ‘पोलिसांना मिळताच घटनास्थळावर हेडकॉन्स्टेबल अरुण गोपनारायण, दिनेश अन्ना, संदिप पवार यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन अधिक चौकडी केली, पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंकेसह पोलीस करत आहेत. तसेच मंडळ अधिकारी नितीन शिंदे व तलाठी अश्विनी शंके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.