कार अपघाताचा प्रतीकात्मक फोटो
कार अपघाताचा प्रतीकात्मक फोटो

अकोला (Akola) : येथील गोरक्षण मार्गावर सहकारनगर नजीक रविवारी मध्यरात्री झालेल्या कार अपघातात मलकापूर भागातील युवक मयूर जयप्रकाश देशमुख ठार झाला. त्याच्या सोबतचे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार, मयूर आणि त्याचे सहकारी लाल रंगाच्या कारमधून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार उलटली. मयूर बाहेर फेकला गेला आणि जागीच मरण पावला. या प्रकरणी खदान पोलिस तपास करीत आहेत.