कोरोनाचा प्रतीकात्मक फोटो
कोरोनाचा प्रतीकात्मक फोटो

  • तर कोरोना संसर्गाने ४ रुग्णांचा मृत्यू

अकोला (Akola ).  जिल्ह्यात आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १४९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १४२ अहवाल निगेटीव्ह तर ७ अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज चार मयत झाले.

त्याच प्रमाणे काल (दि.८) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये १२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ७७६० झाली आहे. आज दिवसभरात ८५ रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ४०१४१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३९१२८ फेरतपासणीचे २०८ तर वैद्यकीय कर्मचा-यांचे ८०५ नमुने होते. आजपर्यंत एकूण ४००७८ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३३७७१ तर पॉझिटीव्ह अहवाल ७७६० आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज ७ पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात ७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ४ महिला व ३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील दिग्रस ता. पातूर, व्याळा ता.बाळापूर, जीएमसी क्वॉटर, राजीव गांधी नगर, जीएमसी, कोठारी नगर व निंबा ता. बाळापूर येथील प्रत्येकी १ या प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

४ रुग्णांचा मृत्यू
दरम्यान आज ४ जणांचा मृत्यू झाला. त्यात निंभोरा, अकोला येथील ५६ वर्षीय पुरुष असून ते ७ ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, फिरदोस कॉलनी येथील ६८ वर्षीय पुरुष असून ते १८ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, तेल्हारा येथील ३५ वर्षीय पुरुष असून ते २३ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, तर वाडेगाव, ता. बाळापूर येथील ७० वर्षीय पुरुष असून ते २९ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.

७२७ रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ७७६० झाली आहे. त्यातील २५३ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची ६७८० संख्या आहे. तर सद्यस्थितीत ७२७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.