Akola girl killed her birth mother by hitting her head on a rock; The police were shocked to find out the reason behind the murder

मुलाने जोरात कानशीलात लगावल्याने जागीच कोसळून आई मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली असताना अकोल्यातही असाच काहीसा प्रकार घडला आहे. एका मुलीने जन्मदात्या आईला दगडावर डोक आपटून आपटून ठार मारलं आहे. मुलीने आईचे हत्या करण्यामागचं कारण समजल्यावर पोलिसांनाही धक्का बसला.

    अकोला : मुलाने जोरात कानशीलात लगावल्याने जागीच कोसळून आई मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली असताना अकोल्यातही असाच काहीसा प्रकार घडला आहे. एका मुलीने जन्मदात्या आईला दगडावर डोक आपटून आपटून ठार मारलं आहे. मुलीने आईचे हत्या करण्यामागचं कारण समजल्यावर पोलिसांनाही धक्का बसला.

    मृत महिलेनी आपली सर्व प्रॉपर्टी आणि शेती आपल्या तीन मुलींच्या नावे केली. यातील एका मुलीने तिच्या वाट्याला आलेली जमीन विकली. या व्यवहारानंतर मृत महिलेने मुलीकडे या पैशातील एक लाख रुपये मागीतले. मात्र, मुलीने पैसे देण्यास नकार दिला.

    यावरुन दोघी माय-लेकींमध्ये वाद झाला. त्यांच्यात झटापटही झाली. यावेळी रागाच्या भरात मुलीने आईचे डोके घरातील घरातील कपडे धुण्याच्या दगडावर जोरजोरात आपटले आणि त्यातच या महिलेचा मृत्यू झाला.

    या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दगडावर पडून आईचा मृत्यू झाल्याचे या निर्दयी मुलीने पोलिसांना सांगीतले. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी कसून चौकशी केली. यावेळी या मुलीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.