अकोला जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीची सभा शुक्रवारी पार पडली.
अकोला जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीची सभा शुक्रवारी पार पडली.

  • अर्थ समिती सभेत सदस्याने मांडला ठराव

अकोला (Akola). १४ व्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी खर्च करण्याची परवानगी शासनाने देण्याबाबतचा ठराव अर्थ समिती सदस्य सुनील फाटकर यांनी सभेत मांडला. तसेच, ठराव शासनाकडे पाठवण्याची विनंती केली.

अकोला जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीची ऑनलाईन सभा जि.प. उपाध्यक्ष तथा अर्थ, आरोग्य समिती सभापती सावित्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. समिती सचिव व मुख्य लेखा व वित्त अधिकारी विद्या पवार यांनी सभेचे कामकाज सांभाळले. सभेला गायत्री कांबे, वर्षा वझीरे, संगीता अढाऊ, संजय बावणे, विनोद देशमुख ,कोमल पेटे,सुनील फाटकर उपस्थित होते.