अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात; महापौरांनी घेतला पाणीपुरवठ्याचा आढावा

अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात महापौर अर्चना मसने व माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत मनपा क्षेत्रात अमृत योजनेअंतर्गत राबविण्यात येणा-या पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला.

  अकोला (Akola).  महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात महापौर अर्चना मसने व माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत मनपा क्षेत्रात अमृत योजनेअंतर्गत राबविण्यात येणा-या पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. बैठकीत स्थायी समिती सभापती संजय बडोणे, नगरसेवक मिलींद राऊत, धनंजय धबाले, अमोल गोगे, मनपा अतिरिक्त आयुक्त सुमंत मोरे, उपायुक्त वैभव आवारे, जलप्रदाय विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एच.जी.ताठे उपस्थित होते.

  बैठकीत अमृत अभियानाअंतर्गत पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. जलवाहिन्यांना पाण्याच्या टाक्या जोडणे बाकी आहे. शहरातील काही भागात तीन दिवसानंतर तर काही भागात सात दिवसानंतर पाणीपुरवठा केला जातो. प्रभाग क्रमांक 18 मध्ये शिवसेना वसाहतीत 100 नळ कनेक्शन देणे बाकी आहे.

  लोकमान्य नगरात पाण्याच्या टाकीची निर्मिती बाकी आहे. जोगळेकर प्लॉटमध्ये जलकुंभाचे काम अंतिम टप्प्यात आहे. शिवनगरात 23 लाख लीटर क्षमतेची आणि लोकमान्य नगरात 15 लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ आहेत.

  काही ठिकाणी वॉल लावणार
  जलकुंभातून पाणीपुरवठा योजना व मॅपिंग न झाल्याने जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत नाही. सोबतच गंगानगर येथील जलकुंभ पू्र्ण क्षमतेने भरला जात नाही. गीता नगरातही काही ठिकाणी पाणीपुरवठा होत नाही.

  काही ठिकाणी वॉल बसविण्याची आवश्यकता असल्याची सूचना देण्यात आली. या बैठकीत जयंत मसने, दिलीप मिश्रा, जलप्रदाय विभागाचे नरेश बावणे, कैलास निमरोट, संदीप चिमनकर, तुषार टिकाईत, अजिंक्य लांबे, रामेश्वर दौड उपस्थित होते.