प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

अकोला (Akola): शहरातील सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका नगरात राहात असलेल्या 13 वर्षीय चिमुकलीला तिची हरविलेली सायकल दाखविण्याचे आमिष देऊन पळवून नेण्याचा प्रयत्न या चिमुकलीनेच हाणून पाडल्याची घटना मंगळवारी घडली. दरम्यान, या प्रकरणी अज्ञात युवकाच्या विरोधात सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या युवकाचे रेखाचित्र जारी करून त्याचा शोध सुरू केला आहे.

  • पोलिसांनी केले आरोपीचे रेखाचित्र जारी

या चिमुकलीला तिची हरविलेली सायकल सापडली असून, ती दाखविण्याचे आमिष देऊन एका दुचाकीस्वार युवकाने तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला; परंतु सदर चिमुकलीने प्रसंगावधान राखीत अपहरणकर्त्या युवकाच्या तावडीतून आपली सुटका करून घेण्यात यश मिळविले. या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न करणरया युवकाचे रेखाचित्र पोलिसांनी जारी केले असून, त्या शोध सुरु करण्यात आला आहे. सदर मुलगी ही सहाव्या वर्गात शिकत असून, मंगळवारी दुपारी ती आपल्या मैत्रिणीसोबत खेळत असताना त्या ठिकाणी दुचाकीवर आलेल्या युवकाने तिच्यासोबत गप्पागोष्टी केल्या आणि तिची हरविलेली सायकल सापडली असून ती तिला परत देण्याच्या बहाण्याने तिला दुचाकीवर बसवून पळवून नेतानाच कृषी पिद्यापीठानजीक कृषी नगर परिसरात या चिमुकलीने युवकाच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली.

त्यानंतर आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मुलीला सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्यात आणले. या ठिकाणी पोलिसांनी तिची विचारपूस केल्यानंतर मुलगी खेळत असलेल्या ठिकाणाची पाहणी केली. मुलीला पळविणारा युवक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.