अकोला जिल्ह्यात ३७ कोरोना रुग्णांची वाढ

जिल्ह्यात आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे १६४५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १६१८ अहवाल निगेटीव्ह तर २७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर व्यक्तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्याच प्रमाणे काल (दि. २०) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये १० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यात ३७ कोरोना रुग्णांची वाढ नोंदविली गेली आहे. आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ८९५६ झाली आहे. आज दिवसभरात १५ रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

अकोला (Akola) : जिल्ह्यात आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे १६४५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १६१८ अहवाल निगेटीव्ह तर २७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर व्यक्तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्याच प्रमाणे काल (दि. २०) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये १० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यात ३७ कोरोना रुग्णांची वाढ नोंदविली गेली आहे. आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ८९५६ झाली आहे. आज दिवसभरात १५ रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

२७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले
दरम्यान आज दिवसभरात २७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व २० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील गोकुल कॉलनी व डाबकी रोड येथील प्रत्येकी तीन जण, जीएमसी व जठारपेठ येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित तांदली ता. पातूर, आस्टूल ता. पातूर, जनूना ता. पातूर, जूना तारफैल, सिरसो ता. मुर्तिजापूर, मुर्तिजापूर, दहातोंडा, कोणवाडी, निंबा ता. मुर्तिजापूर, केलकर हॉस्पीटल, गोरे अपार्टमेंट आकाशवाणी मागे, रेणूका नगर, उमरी नाका, न्यू तापडीया नगर, अकोट, शिवणी व अकोट फैल येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.