अकोला जिल्ह्यात ५९ कोरोना रुग्णांची वाढ; एकाचा मृत्यू

आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे 280 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 250 अहवाल निगेटीव्ह तर 30 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर एकाचा मृत्यू झाला. त्याच प्रमाणे काल (दि.17) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 29 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8,836 झाली आहे. आज दिवसभरात 4 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

अकोला (Akola). आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे 280 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 250 अहवाल निगेटीव्ह तर 30 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर एकाचा मृत्यू झाला. त्याच प्रमाणे काल (दि.17) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 29 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8,836 झाली आहे. आज दिवसभरात 4 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज ३० पॉझिटिव्ह
दरम्यान आज सकाळी 30 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 10 महिला व 20 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मोठी उमरी, गौरक्षण रोड व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी 3, लहान उमरी, गजानन पेठ, निमवाडी व रणपिसे नगर येथील प्रत्येकी 2, तर उर्वरित आळशी प्लॉट, शास्त्री नगर, पिकेव्ही, वाडेगाव, राधेनगर, गड्डम प्लॉट, देवी खदान , मलकापूर, बाळापूर, कौलखेड, विद्या नगर, हरिहरपेठ व जळगाव नहाटे येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

चार जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून एक जण, आयकॉन हॉस्पीटल येथून एक जण, हॉटेल रिजेन्सी येथून दोन जण, अशा एकूण चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण जामठी बु. ता मुर्तिजापूर येथील 80 वर्षीय महिला असून ती दि. 14 नोव्हेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

३७७ रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8,836 आहे. त्यातील 286 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8,173 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 377 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.