अंगणवाड्यांची पाहणी करताना शासकीय कर्मचारी
अंगणवाड्यांची पाहणी करताना शासकीय कर्मचारी

अकोला (Akola):  कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील बालकांना घरपोच पोषण आहार पुरवून अकोला जिल्ह्याने बाजी मारली असतानाच आता या हजारो बालकांना योग्य त्या सुविधा पुरविण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाड्या कात टाकीत असल्याचे दिलासादायक चित्र सध्या पहावयास मिळत आहे. जिल्ह्यात सध्या 29 अंगणवाड्यांचे काम प्रगतीपथावर असून, अन्य अंगणवाड्यांची डागडुजी आणि दुरूस्ती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे.

  • अंगणवाड्यांसाठी आला ६ कोटी २८ लाखाचा निधी

अकोला (Akola):  कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील बालकांना घरपोच पोषण आहार पुरवून अकोला जिल्ह्याने बाजी मारली असतानाच आता या हजारो बालकांना योग्य त्या सुविधा पुरविण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाड्या कात टाकीत असल्याचे दिलासादायक चित्र सध्या पहावयास मिळत आहे. जिल्ह्यात सध्या 29 अंगणवाड्यांचे काम प्रगतीपथावर असून, अन्य अंगणवाड्यांची डागडुजी आणि दुरूस्ती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे.

अकोला जिल्ह्यात एकूण 1390 अंगणवाड्या असून, त्यामध्ये 132 मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे. यामध्ये ग्रामपंचायतींच्या मालकीच्या 1258 इमारतींचा वापर अंगणवाड्यांसाठी करण्यात येत असून, सध्या 132 अंगणवाड्यांना इमारत उपलब्ध नाही. 29 अंगणवाड्यांचे काम जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून सुरू असून, 132 अंगणवाड्या या शाळांच्या इमारतीमध्ये स्थापन करण्यात आल्या आहेत. तर 48 अंगणवाड्या या समाजमंदिरात भरविण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील अंगणवाड्यांसाठी जिल्हा नियोजन समितीच्यावतीने एकूण 6 कोटी 28 लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला असून, त्यापैकी 2 कोटी 46 लाख 50 हजार रूपये नवीन अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी खर्च करण्यात येत आहे तर उर्वरित निधी क्षतिग्रस्त झालेल्या अंगवाड्यांच्या दुरूस्तीसाठी वापरण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात 384 अंगणवाड्यांच्या इमारती जुन्या असल्याने त्यांच्या दुरूस्तीसाठी प्रत्येक अंगणवाडीमागे 1 लाख रूपये खर्च करण्यात येणार आहेत. सन 2021-22 साठी जिल्ह्यात 48 नवीन अंगणवाड्या प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. सध्या 29 अंगणवाड्यांचे बांधकाम प्रगतीपथावर असून, येत्या 31 मार्च 2021 पर्यंत ही कामे पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत कामे पूर्ण न झाल्यास अखर्चित निधी शासनाला परत जाण्याची भीती असल्याने ही कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत.

29 अंगणवाड्यांमध्ये सध्या टाईल्स, पेवर्स, दारे, खिडक्या लावण्यासोबतच प्लास्टर आणि रंगरंगोटीचीही कामे वेगाने सुरू आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी नुकतीच या प्रगतीवर बांधकामे सुरू असलेल्या अंगणवाड्यांना भेटी देवून पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली.

———————————————–
तालुका अंगणवाडी संख्या
———————————————–
अकोला-1 ———— 141
अकोला-2 ———— 167
बार्शीटाकळी———— 183
अकोट ———— 221
तेल्हारा ———— 176
बाळापूर ———— 172
मूर्तिजापूर ———— 190
पातूर ———— 140
———————————————-
एकूण ———— 1390
———————————————