बच्चू कडू चक्क बनले युसुफखाॅं पठाण; वेशांतर करून शिरले शासकीय कार्यालयात, अधिकाऱ्यांची उडाली धांदल

कामातील प्रामाणिकपणा आणि अनोखी कार्यशैली (honesty and unique style of work) याकरिता सुप्रसिद्ध असलेले अकोल्याचे पालकमंत्री (The Guardian Minister of Akola) यांनी सोमवारी अनोख्या पद्धतीने शासकीय कार्यालयांची झाडाझडती (inspected government offices) घेतली.

    अकोला (Akola).  कामातील प्रामाणिकपणा आणि अनोखी कार्यशैली (honesty and unique style of work) याकरिता सुप्रसिद्ध असलेले अकोल्याचे पालकमंत्री (The Guardian Minister of Akola) यांनी सोमवारी अनोख्या पद्धतीने शासकीय कार्यालयांची झाडाझडती (inspected government offices) घेतली. आपल्यापुढे बसलेली व्यक्ती पालकमंत्री असून वेशांतर करून आलेली आहे, हे कळल्यावर अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.

    पालकमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी चक्क वेशांतर अकोला शहर व पातूर शहरातील विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन कारभाराचा धांडोळा घेतला. एवढेच नव्हे, तर त्यांनी स्वस्त धान्य दुकानांही भेटी देऊन धान्य वितरणात काळा बाजार होतो की कसे, याबाबत माहिती घेतली.

    बच्चू कडू यांनी युसुफखाँ पठाण हे बनावट नाव धारण करून महानगरपालिकेचा फेरफटका मारला. विविध विभागांमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा त्यांच्या कक्षात नसल्याने त्यांच्या स्विय सहायकाशी त्यांनी संवाद साधला. विशेष म्हणजे एकही मनपा कर्मचारी बच्चू कडू यांना ओळखू शकला नाही. ते निघून गेल्यानंतर मात्र पालकमंत्री वेश पालटून आले होते, हे समजताच मनपा परिसरात मोठी खळबळ उडाली होती.