सुंदर मुलीचा प्रोफाइल फोटो असलेली फ्रेंड रिक्वेट आली? सावधान! तुम्हीही होऊ शकता ‘असल्या’ प्रसंगांचे शिकार

ऑनलाईन ब्लॅकमेलर्सनी (Online blackmailers) नागरिकांकडून पैसे उकळविण्यासाठी (to extort money from citizens) वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधून काढल्या आहेत. यामध्ये सुंदर मुलीचा प्रोफाइलवर फोटो लावून (by putting a photo of the beautiful girl on her profile) एखाद्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते.

  अकोला (Akola). ऑनलाईन ब्लॅकमेलर्सनी (Online blackmailers) नागरिकांकडून पैसे उकळविण्यासाठी (to extort money from citizens) वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधून काढल्या आहेत. यामध्ये सुंदर मुलीचा प्रोफाइलवर फोटो लावून (by putting a photo of the beautiful girl on her profile) एखाद्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते. तोसुद्धा कुतुहलापोटी ती रिक्वेस्ट स्वीकारतो.

  मॅसेंजरवरून (Messenger) एकमेकांसोबतच चॅटिंग (Chatting with each other) सुरू होते; पण पुढे जे काही घडते. त्यामुळे ‘तो’ मुळासकट हादरून जातो. कारण चॅटिंगच्या ओघात आणि उत्सुकतेत मनाचा तोल जातो आणि तो सायबर ब्लॅकमेलर्सच्या (cyber blackmailers) जाळ्यात अलगद अडकल्या जातो.

  केवळ अकोला जिल्ह्याचे नव्हे तर अवघ्या राज्यात अशा घटनांमध्ये वाढ होत आहेत. अनेक जण बदनामीपोटी पोलिसांकडे तक्रार करण्याचे टाळतात. यामुळे गुन्हेगारांची हिम्मत आणखी वाढत जाते. सायबर सेलने याविषयी नागरिकांची ऑनलाईन जागृती सुरू केली आहे.

  ऑनलाईन फसवणुकीसाठी सायबर गुन्हेगार विविध फंडे वापरतात. गत काही वर्षांपासून फसवणुकीच्या या प्रकाराबाबत जनजागृती हाेत आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी नवीन मार्ग निवडला आहे. फेसबुकवर तरुण, मध्यमवर्गीय लाेकांना सुंदर मुलीचा फाेटाे असलेल्या प्राेफाईलवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात येते. ही रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर मुलीच्या नावाने संदेशाचे आदान प्रदान सुरू हाेते. यादरम्यान, व्हाॅट्सॲप क्रमांक मिळवून त्यावरही व्हिडिओ काॅल सुरू हाेतात. व्हिडिओ काॅलदरम्यान शुटिंग करून त्याची रेकाॅर्डिंग संबंधित व्यक्तीला पाठवून पैशांची मागणी करण्यात येते.

  वेगवेगळ्या क्रमांकांवरून फाेन करून संबंधित व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यात येते. अनेक जण बदनामीच्या भीतीने मागेल तेवढे पैसे संबंधितांच्या खात्यात टाकतात. शिवाय कुणाला काहीही सांगत नसल्याने सायबर गुन्हेगारांचे फावते. त्यामुळे जनजागृती करण्यात येत आहे. फेसबुकवर अनाेळखी फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास ती स्वीकारू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

  अशी करतात फसवणूक
  फेसबुकवरून संदेशाचे आदान-प्रदान केल्यानंतर तुम्हाला व्हाॅट्सॲप क्रमांक विचारतात. व्हाॅट्सॲपवर व्हिडिओ काॅल सुरू हाेतात. या काॅलदरम्यान उत्तेजित करून आपले नग्न फाेटाे, व्हिडिओ रेकाॅर्डिंग करण्यात येते. त्यानंतर ती रेकाॅर्डिंग संबंधिताला पाठवून व्हायरल करण्याची भीती दाखवण्यात येते. व्हिडिओ नातेवाईकांपर्यंत पाठविण्याची भीती दाखवण्यात येते. त्यामुळे त्यांच्या जाळ्यात अनेक जण फसतात़ तसेच त्यांनी मागितलेले पैसे अनेक जण देऊन टाकतात.

  तक्रार दाखलच करीत नाहीत!
  अनेक जण व्हिडिओमध्ये असल्यामुळे फसवणूक झाली तरी पाेलीस स्टेशन किंवा सायबर सेलकडे तक्रार देत नाहीत. अनेक जण ही बाब कुणालाही सांगत नाहीत. त्यामुळे सायबर गुन्हेगारांचे फावते. जिल्ह्यात असे अनेक प्रकार घडले असले, तरी तक्रार मात्र एकही दाखल झालेली नाही.

  अशी घ्यावी खबरदारी!
  अनाेळखी मुलीची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास स्वीकारू नये. चुकून फ्रेंड रिक्वेट स्वीकारली तरी त्या मुलीला प्रतिसाद देऊ नये. फसवणूक झाल्यास तातडीने जवळचे पाेलीस स्टेशन किंवा सायबर सेलकडे तक्रार करावी.

  फेसबुकवर अनाेळखी मुली फ्रेंड रिक्वेट पाठवतात. त्यानंतर व्हाॅट्सॲपवर व्हिडिओ काॅल करून उत्तेजित करतात. नग्न व्हिडिओ काॅलचे रेकाॅर्डिग करून ब्लॅकमेल करतात. त्यामुळे अशा फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये़त. फसवणूक झाल्यास तातडीने तक्रार दाखल करावी़. सायबर सेलकडून याविषयी जनजागृतीही करण्यात येत आहे़.
  —- विलास पाटील, दहशतवाद विरोधी कक्ष