प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

अकोला (Akola) : रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे स्टेशनसमोर आयपीएलच्या सामन्यांवर खुलेआम सुरू असलेल्या सट्टा अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणावरून तीन बुकींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंडियन प्रीमिअर लीगच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व राजस्थान रॉयल्स यांच्यादरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर रेल्वे स्टेशन चौकातील एका चहाच्या दुकानाजवळ मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती रामदासपेठ पोलिसांना मिळाली.

या माहितीवरून पथकाने सदर ठिकाणावर पाळत ठेवून सामन्यावर सट्ट्याची देवाण-घेवाण करीत असताना मो. शाबाद मो. फजल, मो. इलियास मो. महमूद, दोघेही राहणार मच्छी मार्केट व राजेश पालुमल जसमतिया, रा. सिंधी कॅम्प या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुध्द रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.