भर कार्यक्रमात महिला बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात तक्रार

महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर( Women and Child Development Minister Yashomati Thakur) यांनी भर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार( Deputy Chief Minister Ajit Pawar) साथ देत नसल्याचा आरोप केला आहे. बालसंगोपन निधी अनुदानात वाढ करण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार साथ देत नसल्याचे त्यांनी म्हटल्याने कॉंग्रेस राष्ट्रवादीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालूक्यात आयोजित अन्यायग्रस्त शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

    बाळापूर : महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर( Women and Child Development Minister Yashomati Thakur) यांनी भर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार( Deputy Chief Minister Ajit Pawar) साथ देत नसल्याचा आरोप केला आहे. बालसंगोपन निधी अनुदानात वाढ करण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार साथ देत नसल्याचे त्यांनी म्हटल्याने कॉंग्रेस राष्ट्रवादीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालूक्यात आयोजित अन्यायग्रस्त शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

    या कार्यक्रमात महसूल मंत्री बाळासाहेब थोरातदेखील उपस्थित होते. बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार करताना यशोमती ठाकूर यांनी अजित पवार सहकार्य करत नसल्याचा आरोप केला की बालसंगोपनाचे कित्येक वर्षांपासून ४५० रुपये मिळत होते. आपण काही काळापूर्वी ११२५ रुपये केले आहेत.

    पण माझी अशी इच्छा आहे की, किमान त्यांना २५०० रुपये त्या लेकरांना द्यायला हवे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे असा प्रस्ताव आम्ही पाठवला आहे. पण उपमुख्यमंत्री आम्हाला पाहिजे तेवढी साथ देत नाहीत. तुम्ही जर बोललात तर साथ मिळेल,” असे यशोमती ठाकूर यांनी यावेळी म्हटले आहे.