कोरोना नियमांचे उल्लंघन भोवले; ४० ऑटोसह ६० वाहनांवर गुन्हे दाखल

शहरातील काही ऑटोचालक निर्देशाचा भंग करून 2 पेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले, असे 40 ऑटो शहर वाहतूक शाखेत लावून त्यांचेवर गुन्हे दाखल केले.

    अकोला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मागील एक महिन्यापासून अकोला जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. कोरोना नियमांचा भंग करणाऱ्या 40 ऑटोसह 60 वाहनांवर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी आज कारवाईचा बडगा उगारला.


    शहरातील काही ऑटोचालक निर्देशाचा भंग करून 2 पेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले, असे 40 ऑटो शहर वाहतूक शाखेत लावून त्यांचेवर गुन्हे दाखल केले. तसेच संचारबंदीचा भंग करून विनाकारण फिरणाऱ्या जवळपास 20 मोटारसायकल चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याव्यतिरिक्त 350 वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून जवळपास 20,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या निर्देशाने अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी केली. ऑटो चालकांनी 2 पेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतूक करू नये, अन्यथा ऑटो जप्त करून गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी दिला आहे