दक्षतानगर उड्डाणपूल, अंडरपास जुलैपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

अकोला शहराच्या मध्यभागात आळशी प्लॉटपासून स्टेशन रोडवर क्रिकेट क्लबपर्यंत उड्डाणपूल निर्मिती वेगाने सुरू आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त १७२ कोटी रुपयांतून पूल तयार होत असून हा पूल आणि मदनलाल धिंग्रा चौकातील अंडरपासचे काम जुलैपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  अकोला (Akola).  शहराच्या मध्यभागात आळशी प्लॉटपासून स्टेशन रोडवर क्रिकेट क्लबपर्यंत उड्डाणपूल निर्मिती वेगाने सुरू आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त १७२ कोटी रुपयांतून पूल तयार होत असून हा पूल आणि मदनलाल धिंग्रा चौकातील अंडरपासचे काम जुलैपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुलाचे काम वेगाने सुरू आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊन राहिले नसते तर हे काम आतापर्यंत पूर्ण झाले असते.

  पुलावर चढण्यासाठी तीन, उतरण्यास चार रस्ते
  या उड्डाणपुलावरून जड वाहने जाऊ शकतील. ज्यामुळे ट्रान्सपोर्टच्या कामात अडचण येणार नाही. पुलावर चढण्यासाठी जेलसमोर, क्रिकेट क्लब आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोरचा मार्ग राहील. तर उतरण्यासाठी जेलसमोर, क्रिकेट क्लब समोर आणि आळशी प्लॉट चौकात वजीफदार पेट्रोलपंपसमोर आणि जनता बाजारात उतरता येईल. पुलावर चढण्यासाठी तीन तसेच उतरण्यासाठी तीन रस्ते राहतील.

  दक्षतानगर उड्डाणपूल
  दक्षतानगर उड्डाणपुलाचे निर्माण कार्य देखील वेगाने सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वर एनसीसी ऑफिससमोरून दक्षतानगरपर्यंत पूल तयार करण्यात येत आहे. जुलैपर्यंत हे काम देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे.

  अंडरपासचे काम वेगात
  उड्डाणपुलाची निर्मिती तसेच विश्रामगृहासमोरून अंडरपासचे काम गतीने सुरू आहे. या मार्गामुळे सर्व वाहने अंडरपासने जाऊ शकतील. भाटे ग्राऊंडसमोर त्यांना बाहेर पडता येईल. यामुळे मदनलाल धिंग्रा चौकातील वाहतूक सुरळीत होईल. तसेच नागरिकांनाही दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.