धान्य मळणी यंत्र
धान्य मळणी यंत्र

बोरगाव मंजू (Borgaon Manju) : अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पळसो बढे शेतशिवारात सोयाबीन काढणी सुरू असताना मळणी यंत्रात सापडून एका 27 वर्षीय युवकाचा जागीच दुर्दैवी करूण अंत झाल्याची घटना शनिवार रोजी दुपारच्या सुमारास घडली. संजय सोळंके असे युवकाचे नाव आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पळसो बढे येथील शेतशिवारात ट्रॅक्टरवर चालणा-या मळणी यंत्रावर संजय चिंतामण सोळंके (वय २७ वर्षे), रा.पळसो बढे हा रोजंदारीवर काम करीत होता. त्याच्यासोबत इतरही चार ते पाच मजूर शनिवारी कामावर हजर होते. दुपारी शेतातील सोंगलेले सोयाबीन मळणी यंत्रात टाकत असतानाच संजय सोळंके हा या अचानक मळणी यंत्रात सापडून त्याचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार हरीश गवळी, कॉन्स्टेबल प्रकाश कोकरे, नागरगोजे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मळणी यंत्रात अडकून पडलेला संजय सोळंके याचा मृतदेह एक तासाच्या परिश्रमानंतर बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास बोरगाव मंजू पोलिस करीत आहेत.