बाजारात खरबूज, टरबूज, आंबे, द्राक्षांना मागणी; स्ट्राबेरीलाही ग्राहकांची पसंती

शहरात उष्मा जाणवू लागल्याने टरबूज, खरबूज, आंबे आणि द्राक्ष या फळांना मागणी दिसत आहे. बाजारामध्ये विविध ठिकाणचे आंबे दिसू लागले आहेत. सोबतच स्ट्रॉबेरीलाही मागणी दिसत आहे. गोरक्षण रोडवरील बालाजी फ्रूटचे संचालक गुप्ता म्हणाले, नाशिक येथून द्राक्षे येतात. तसेच सध्या फळांचे भाव स्थिर आहेत. द्राक्षे 120 ते 160, हिरवी द्राक्षे 60 ते 100 रू. किलोनुसार उपलब्ध आहेत.

    अकोला (Akola).  शहरात उष्मा जाणवू लागल्याने टरबूज, खरबूज, आंबे आणि द्राक्ष या फळांना मागणी दिसत आहे. बाजारामध्ये विविध ठिकाणचे आंबे दिसू लागले आहेत. सोबतच स्ट्रॉबेरीलाही मागणी दिसत आहे. गोरक्षण रोडवरील बालाजी फ्रूटचे संचालक गुप्ता म्हणाले, नाशिक येथून द्राक्षे येतात. तसेच सध्या फळांचे भाव स्थिर आहेत. द्राक्षे 120 ते 160, हिरवी द्राक्षे 60 ते 100 रू. किलोनुसार उपलब्ध आहेत.

    अकोला शहरात पुणे आणि पातूर येथून टरबूज येत आहेत. टरबूज गोड आणि लाल असल्याने ग्राहकांकडून त्याला मागणी असते. टरबूज 15 ते 20 रु. किलो, खरबूज 30 ते 50 रु. किलो. खरबूजही पुणे, मेळघाट, अमरावती येथून आणले जातात. आंब्यासोबत अन्य फळेही उपलब्ध आहेत. गुलाब, केसर, बदाम आंबे बाजारात उपलब्ध आहेत. केरळहून हे आंबे येतात. गुलाब केसर आंबे 175 ते 250 रु. किलोप्रमाणे उपलब्ध आहेत. सोबतच चिकू देखील मोठ्या संख्येत मिळत आहेत. अकोला जिल्ह्यातील चिकू 60 ते 80 तथा गुजरातहून आलेले चिकू 70 ते 100 रु. नुसार मिळत आहेत. जालन्याची मोसंबी 100 ते 120 रु., अमरावतीची संत्री 60 ते 80 रु., किवी 80 ते 100 रु. पाकिटानुसार उपलब्ध आहेत. औरंगाबादहून येणारे ड्रॅगन फळ 100 के 120 रु. नग, आंध्रप्रदेशातून येणारे पाईनॅपल 70 ते 100 रु. नगाने मिळत आहेत.

    सफरचंदाचे भाव वाढले आहेत. न्यूझिलंडहून येणारे सफरचंद 200 ते 240 रू. किलोप्रमाणे उपलब्ध आहेत. स्वीटकॉर्नलाही चांगली मागणी आहे. ते 30 रु. जोडीनुसार मिळतात. भुसावळची केळी 25 ते 40 रु. डझन मिळतात. तसेच रामफळ देखील बाजारामध्ये उपलब्ध आहे. पातूर, बुलडाणा येथून जिल्ह्यात रामफळ येतात. 80 ते 120 रु. किलोनुसार ते उपलब्ध आहेत. पिकलेले कविठ 20 ते 30 रु. जोडीने मिळते. शहाळ 25 ते 30 रु. प्रति नगप्रमाणे मिळत आहेत. सर्वच फळांना चांगला मागणी आहे.