लॉकडाऊनमध्ये दुजाभाव होत असल्याने व्यापा-यांमध्ये असंतोष

कोरोनाचा भडका उडाल्यामुळे संपूर्ण राज्यात आवश्यक सेवा वगळता सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले. मात्र, मानोरा शहरात याच्या विरुद्ध परिस्थिती पहायला मिळत आहे.

    मानोरा (Manora).  कोरोनाचा भडका उडाल्यामुळे संपूर्ण राज्यात आवश्यक सेवा वगळता सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले. मात्र, मानोरा शहरात याच्या विरुद्ध परिस्थिती पहायला मिळत आहे.

    बियर बार, चिकन, मटण, मासोळी, डेली निड्स व गुटख्याची काही दुकाने सुरू आहेत. त्यामुळे ही दुकाने कोणाच्या इशा-यावर सुरू आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. लॉकडाऊनमध्ये संबंधित प्रशासनाकडून दुजाभाव का? असा सवाल व्यापारी वर्गातून व्यक्त होत असून पाठिशी घालणा-यांवर कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.

    राज्यात कोरोनाचा वाढता आलेख पाहता, शासनाने आवश्यक दुकाने वगळता 30 एप्रिल पर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शहरातील आवश्यक दुकाने वगळता ता.6 एप्रिलला इतर दुकाने बंद केली. असे असताना शहरातील बियर बार, डेली निड्स, पान पट्टी, खर्याची दुकाने, चिकन, मटण,मासोळी व गुटखा विक्रीची दुकाने सुरू होती. मग ही दुकाने आवश्यक सेवांमध्ये मोडतात का?असा सवाल व्यापारी वर्गातून व्यक्त होत असून उसाची रसवंती बंद ठेवून बियरबार सुरू ठेवून प्रशासन नेमके काय साध्य करू पाहत आहे.

    आवश्यक सेवा वगळता राजरोसपणे सुरू ठेवलेली ही दुकाने नेमकी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत. असा प्रश्न उपस्थित होत असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी व्यापारी वर्गातून केली जात आहे. प्रशासनाच्या दुजाभाव धोरणाबद्दल व्यापा-यांनी संतापही व्यक्त केला.