शिधापत्रिका धारकांना निकृष्ट दर्जाच्या मक्याचे वाटप; ना. भुजबळ यांना पाठविण्यात आला निकृष्ट मका

मूर्तिजापूर तालुक्यातील शिधापत्रिका धारकांना वाटप करण्यात आलेला मका अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून, तो मका जनावरेसुद्धा खात नाही. सदर निकृष्ट धान्याचे वाटप बंद करून शासनाने चांगल्या प्रकारचे धान्य शिधापत्रिका धारकांना उपलब्ध करून द्यावे, असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पाठविण्यात आले आहे.

    मूर्तिजापूर (Murtijapur).  तालुक्यातील शिधापत्रिका धारकांना वाटप करण्यात आलेला मका अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून, तो मका जनावरेसुद्धा खात नाही. सदर निकृष्ट धान्याचे वाटप बंद करून शासनाने चांगल्या प्रकारचे धान्य शिधापत्रिका धारकांना उपलब्ध करून द्यावे, असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पाठविण्यात आले आहे.

    रंभापूर गटग्रामपंचायतचे सरपंच प्रशांत इंगळे यांनी गरिबांना वाटप करण्यात आलेला निकृष्ट दर्जाचा मकाही मंत्री महोदयांना पाठविला आहे. राज्यामध्ये कोरोना या महामारीने थैमान घातले आहे. कित्येक लोकांना आपल्या जीवापासून मुकावे लागले आहे. एकीकडे कोरोनाचे संकट व दुसरीकडे उन्हामुळे होणारे दुष्परिणाम तसेच निकृष्ट दर्जाचे धान्य सेवन केल्यामुळे मानवी शरीरातील रोग प्रतिकात्मक शक्ती कशी वाढणार असा संतप्त सवाल सरपंच प्रशांत इंगळे यांनी केला.

    महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी तसेच सर्व सरपंचांनी मासिक सभेमध्ये या निकृष्ट धान्याविषयी ठराव घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठरावाची मूळ प्रत पाठविण्याचे आवाहनही प्रशांत इंगळे यांनी केले आहे.