डॉक्टरांची आर्थिक कोंडी, १२० प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा कोविड वार्डात रुग्णसेवा देण्यास नकार

जीएमसी प्रशासनाने अद्यापही जिल्हाधिकाऱ्यांकडे कोविड भत्त्याचा प्रस्ताव न दिल्याने प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी गुरुवारी स्वत:च जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कोविड भत्त्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी दिली.

अकोला : कोरोना काळात डॉक्टरांना (Doctors) कोविड भत्ता मिळत नसल्याने वैद्यकीय महाविद्यालयातील १२० प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी कोविड वार्डात (covid ward) रुग्णसेवा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या डॉक्टरांनी कोविड सेवा द्यावी (doctors refuse to provide services) म्हणून त्यांना जीएमसी प्रशासनाकडून धमकवण्यात येत अल्याची माहिती मीळाली आहे.

रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर मागील ६ महिन्यांपासून नॉन कोविडसह कोविड वार्डतही रुग्णसेवा करत आहेत. परंतु कोविड रुग्णांच्या वार्डमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टरांना कोविड भत्ता दिला जातो. राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना सुद्धा हा भत्ता लागू आहे. त्यामुळे आम्हाला का भत्ता दिला जात नाही. असा प्रश्न या डॉक्टरांनी उपस्थित केला आहे.