श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला
श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला

अकोला (Akola): अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील पाण्याचे नमुने घेऊन शिवाजी महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रात देशात प्रथमच पाण्यातील युरेनियमच्या प्रमाणावर अलीकडेच संशोधन करण्यात आले, अशी माहिती महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. दरम्यान, पाणी, जीव, वनस्पतीवरील संशोधनासाठी विद्यापीठ अनुदान आयोग(यूजीसी)कडून 98 लाखांचा निधी प्राप्त झाल्याने महाविद्यालयातील उच्च दर्जाच्या संशोधन कार्याला अधिक चालना मिळेल अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

  • श्री शिवाजी महाविद्यालयाच्या संशोधन केंद्राचा उपक्रम

अकोला (Akola): अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील पाण्याचे नमुने घेऊन शिवाजी महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रात देशात प्रथमच पाण्यातील युरेनियमच्या प्रमाणावर अलीकडेच संशोधन करण्यात आले, अशी माहिती महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. दरम्यान, पाणी, जीव, वनस्पतीवरील संशोधनासाठी विद्यापीठ अनुदान आयोग(यूजीसी)कडून 98 लाखांचा निधी प्राप्त झाल्याने महाविद्यालयातील उच्च दर्जाच्या संशोधन कार्याला अधिक चालना मिळेल अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

संशोधनासाठीच्या 98 लाखांच्या निधीच्या माध्यमातून महाविद्यालयातील संशोधन केंद्रात तीन अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध झाली आहेत, ज्याद्वारे परिसरातील पाणी, जीव-जंतू आणि वनस्पती यासंबंधी नॅनो स्तरावरील संशोधन यापुढे अकोल्यात करणे शक्य होणार आहे. नुकताच महाविद्यालयाने या उपकरणांद्वारे राष्ट्रीय सर्व्हेक्षणासाठी आपल्या भागातील पाण्यातील युरेनियमच्या प्रमाणाचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला आहे. पत्रकार परिषदेला कवी डॉ. विठ्ठल वाघ, महाविद्यालय विकास समितीचे वरिष्ठ सदस्य प्रा. राजाभाऊ देशमुख, प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, डॉ. जी. व्ही. कोरपे, डॉ. आशिष राऊत, डॉ. अनिल राऊत, डॉ. संजय खड्क्कार, डॉ. विवेक हिवरे, राजेश गीते उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना रसायन शास्त्र विभागाचे डॉ. जी. व्ही. कोरपे म्हणाले, की पंजाबमध्ये भूगर्भातील पाण्यामध्ये युरेनियमचे प्रमाण प्रचंड दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर देशभरातील भूगर्भातील पाण्याच्या संशोधनाचे कार्य केंद्र सरकारकडून हाती घेण्यात आले. या कार्यात अकोला येथील महाविद्यालयाला सहभाग असणे एक मोठी उपलब्धी असल्याचे डॉ. कोरपे यांनी नमूद केले. यावेळी प्राचार्य डॉ. भिसे यांनीही महाविद्यालयातील अन्य संशोधनाविषयी माहिती दिली. महाविद्यालयामध्ये एकूण 15 संशोधन केंद्रामधून अनेक विद्यार्थी संशोधन करत असून, गेल्या 10 वर्षांपासून नॅकव्दारा अ दर्जा मिळवण्यात संशोधनाचा महत्वाचा हातभार असल्याचे ते म्हणाले.

महाविद्यालयामध्ये एकूण 6 दीर्घ शोधप्रबंध आणि 6 वर संशोधन कार्य सुरु आहे. मागील वर्षी ही उपकरणे महाविद्यालयात 98 लाख रुपयाच्या निधी अंतर्गत प्राप्त झाली असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधनाला वाव मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महाविद्यालयात निर्माणाधिन आयटी पार्क, कॉम्प्युटर सायन्स लॅब, तसेच विविध विषयावरील रोजगार सेल आदिंबाबत माहिती देण्यात आली. यावेळी प्रा. ताठे, डॉ. उमेश घाडेस्वार आदिंची उपस्थिती होती.