शासकीय रूग्णालय, अकोला
शासकीय रूग्णालय, अकोला

अकोला जिल्ह्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला असून, सध्या कोरोनाशी झगडत असलेल्या शासकीय रूग्णालयांना उष्माघात कक्ष स्थापन करण्याचा विसर पडल्याचे चित्र आहे.

    अकोला (Akola).  जिल्ह्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला असून, सध्या कोरोनाशी झगडत असलेल्या शासकीय रूग्णालयांना उष्माघात कक्ष स्थापन करण्याचा विसर पडल्याचे चित्र आहे. शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयासोबतच तालुकास्तरावरील ग्रामीण रूग्णालयांनीही उष्माघात कक्ष स्थापन करण्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.

    अकोला दरवर्षी उन्हाळ्यात चांगलेच तापत असते. बुधवारी आणि गुरूवारीही अकोल्यात विदर्भातील सर्वाधिक 42.9 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. एकीकडे नागरिक कोरोनाचा सामना करीत असताना आता उष्म्याने नागरिकांना हैराण करण्यास सुरूवात केली आहे. अकोल्यात गेल्या आठवड्यापासूनच पारा वाढण्यास सुरूवात झाली. विदर्भातील अनेक जिल्ह्यांनी गेल्या आठवड्यातच पारा चाळीशी ओलांडली आहे.

    त्या पृष्ठभूमीवर जागोजागी उन्हापासून संरक्षणासाठी टोप्या, पांढरे दुपट्टे, गॉगल्स या वस्तूंसोबतच रसवंती आणि शितपेयाची दुकाने थाटण्यात आली आहेत. आरोग्य विभागाला मात्र या परिस्थितीत अत्यावश्यक असलेला उष्माघात कक्ष स्थापन करण्याचा विसर पडल्याचे एकंदरीत जिल्ह्याचे चित्र आहे.