लॉकडाऊन काळात रोटरी क्लब इस्टद्वारा रोज १०० लोकांना नि:शुल्क भोजन

लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूं व्यतिरिक्त प्रतिष्ठाने बंद आहेत. तसेच सध्याची स्थिती लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ अकोला इस्टच्या सर्व्हिस प्रोजेक्ट अंतर्गत अमृत भोजन योजनेंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर नियमितपणे 100 लोकांना नि:शुल्क भोजन वितरीत केले जात आहे.

  अकोला (Akola).  लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूं व्यतिरिक्त प्रतिष्ठाने बंद आहेत. तसेच सध्याची स्थिती लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ अकोला इस्टच्या सर्व्हिस प्रोजेक्ट अंतर्गत अमृत भोजन योजनेंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर नियमितपणे 100 लोकांना नि:शुल्क भोजन वितरीत केले जात आहे. ज्यामध्ये पोळी, भाजी, मसाला खिचडीचा समावेश असतो. स्त्री रुग्णालयात दाखल रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांना लाभ होतो.

  आधी १० रुपयात मिळायचे अमृत भोज
  लॉकडाऊनपूर्वी रोटरी क्लब ऑफ इस्टद्वारा नियमितपणे १० रुपयात भोजन दिले जायचे. क्लबची योजना गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मागील लाकडाऊनमध्ये 35,500 लोकांना नि:शुल्क भोजन देण्यात आले होते, आणि आताची स्थिती लक्षात घेऊन उपक्रम सुरू असल्याचे रोटरी सर्व्हिस प्रोजेक्टचे कोषाध्यक्ष विजयकुमार जानी यांनी सांगितले.

  सेवा भावनेतून कार्य
  विजयकुमार जानी म्हणाले, रोटरी क्लब ऑफ अकोला इस्टचे सर्व्हिस प्रकल्प अध्यक्ष इस्माइल नज्मी तर, सचिव ब्रिजमोहन चितलांगे आहेत. तर, चंद्रप्रकाश लढ्ढा क्लबचे अध्यक्ष आहेत. सर्वांच्या सहयोगातून अमृत भोज प्रकल्प चालवला जात आहे. सेवा भावनेतून प्रकल्प चालवण्यात येत आहे. समाजाप्रती दायित्व हा उद्देश ठेवून कार्य करीत असल्याने त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.

  लोकांच्या आवश्यकतेला प्राधान्य
  सद्यस्थितीत लाकडाऊनमुळे लोक बेरोजगार झालेत. लहान सहान कामे करणा-यांना अडचणी सतावत आहेत. रोजी रोटी बंद झाल्याने पोट भरण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. अशावेळी त्यांना मदतीचा हात द्यावा, या उद्देशाने रोटरी क्लब इस्ट द्वारा 100 लोकांच्या भोजनाची व्यवस्था आम्ही केली आहे. सेवा कार्य म्हणून प्रकल्प राबवित आहोत.