भविष्यात आंबेडकरांशी आघाडी; नाना पटोलेंचे संकते

निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय आघाडीची मोठी चर्चा सुरू होते. याचसंदर्भात काँग्रेसने आंबेडकरांशी भविष्यात जुळवून घेण्याची संकेत दिले आहेत. प्रकाश आंबेडकरांशी आघाडीच्या दृष्टीने चर्चा करणार मोठे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केले आहे. सध्या नाना पटोले काँग्रेसच्या संघटनात्मक कामांचा आढावा घेण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांशी भविष्यातील आघाडीच्या मुद्यावर संकेत दिले.

  अकोला : निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय आघाडीची मोठी चर्चा सुरू होते. याचसंदर्भात काँग्रेसने आंबेडकरांशी भविष्यात जुळवून घेण्याची संकेत दिले आहेत. प्रकाश आंबेडकरांशी आघाडीच्या दृष्टीने चर्चा करणार मोठे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केले आहे. सध्या नाना पटोले काँग्रेसच्या संघटनात्मक कामांचा आढावा घेण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांशी भविष्यातील आघाडीच्या मुद्यावर संकेत दिले.

  धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी आंबेडकरांशी चर्चा करणार असल्याचे पटोले म्हणाले. काही छोट्या पक्षांशीही आघाडीसंदर्भात चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, सध्या आंबेडकरांशी कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

  नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. शरद पवार यांनी 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार असल्याचे वक्तव्य केले होते. यावरही नाना पटोले यांनी शरद पवारांचा एकीचा दावा खोडून काढला.

  काँग्रेस निवडणुका स्वबळावर लढणार. ते आमचे मित्रपक्ष आहेत आणि मित्रपक्षांचे प्लानिंग वेगळे असेल, काँग्रेस म्हणून आमची तयारी सुरू केली आहे. विधानसभा असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असो, या निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे. राष्ट्रवादी आमचा मित्रपक्ष असल्याने बसून काय निर्णय होईल ते बघू. परंतु आमच्यासमोर त्यांचा कोणताही प्रस्ताव नाही.

  - नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
  हे सुद्धा वाचा