आयटक संघटनेची मागण्यांसाठी निदर्शने (अकोला)
आयटक संघटनेची मागण्यांसाठी निदर्शने (अकोला)

अकोला (Akola).  कोरोना योद्धा म्हणून कार्यरत आशा गट प्रवर्तकांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे मागील 7 महिन्यांच्या फरकाची रक्कम तातडीने द्यावी अशी मागणी आयटक संघटनेने केली आहे. आयटकच्या वतीने बुधवार, 14 रोजी इतर मागण्यांसाठी कामगार नेता नयन गायकवाड यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आले.

  • मागण्यांसाठी आयटकची निदर्शने

अकोला (Akola).  कोरोना योद्धा म्हणून कार्यरत आशा गट प्रवर्तकांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे मागील 7 महिन्यांच्या फरकाची रक्कम तातडीने द्यावी अशी मागणी आयटक संघटनेने केली आहे. आयटकच्या वतीने बुधवार, 14 रोजी इतर मागण्यांसाठी कामगार नेता नयन गायकवाड यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आले.

आरोग्य खात्यात 27 हजार पदे रिक्त असूनही कंत्राटी कामगारांची भरती केली जाते. आशा, गट प्रवर्तक महिलांना 15500/- रु. दरमहा तसेच प्रवास भत्ता अतिरिक्त द्यावा, आदी मागण्या करुन केंद्र शासनाच्या कामगार धोरणाचा निषेध केला. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिमेसाठी 300 रुपये अतिरिक्त मानधन द्यावे, दैनंदिन भत्ता सुरू करावा, सामाजिक सुरक्षेच्या लाभ द्यावा, कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन सुरक्षा साधने कामगारांना उपलब्ध करुन द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात नयन गायकवाड, मायावती बोरकर, छाया वारके, सविता प्रधान, अश्विनी लंकेश्वर, निर्मला लव्हाळे, प्रीती नाईशे, प्रमिला डाबेराव सहभागी झाल्या होत्या.