प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

शासकीय वाहनाच्या (government vehicle) धडकेत दुचाकीस्वार (two wheeler) दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना पळसो बढे- अकोला मार्गावर मार्गावर कौलखेड़ जहाँगीर फाट्या जवळ १६ जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडली.

    मूर्तिजापूर (Murtijapur). शासकीय वाहनाच्या (government vehicle) धडकेत दुचाकीस्वार (two wheeler) दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना पळसो बढे- अकोला मार्गावर मार्गावर कौलखेड़ जहाँगीर फाट्या जवळ १६ जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडली.

    माधुरी राहुल पवार (२८) व सोनी मंगेश पवार (२८) राहणार स्टेशन विभाग मूर्तिजापूर या दोन महिला आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ३० बी के ५८२५ या दुचाकीवरुन मूर्तिजापूरकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव शासकीय वाहन क्रमांक एमएच ३० एच २८९ ने जोरदार धडक दिली.

    बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या या अपघातात दुचाकीस्वार दोन्ही महीला गंभीर जखमी झाल्या. जखमी महिलांना तात्काळ उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. वृत्त लिहिस्तोवर सदर प्रकारणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.