पदवीधारक शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत पिकविली कोथिंबीर

तेल्हारा तालुक्यातील अटकळी हे छोटेसे गाव असून या गावातील सर्वच शेतकरी पीक घेतात, मात्र पदवीधारक युवा शेतकरी संदीप प्रल्हाद दारोकार याला अपवाद ठरले. त्यांनी कपाशी, हरभरा, तूर, गहू, ज्वारी आदी पिकांच्या पारंपरिक शेतीला फाटा देत कोथिंबीरची शेती केली.

    तेल्हारा (Telhara).  तालुक्यातील अटकळी हे छोटेसे गाव असून या गावातील सर्वच शेतकरी पीक घेतात, मात्र पदवीधारक युवा शेतकरी संदीप प्रल्हाद दारोकार याला अपवाद ठरले. त्यांनी कपाशी, हरभरा, तूर, गहू, ज्वारी आदी पिकांच्या पारंपरिक शेतीला फाटा देत कोथिंबीरची शेती केली.

    विशेष बाब म्हणजे पदवीधारक युवकाने उच्च शिक्षण घेऊन नोकरी न लागल्याने नैराश्यात न राहता तथा इतर कोणताही व्यवसाय न निवडता वडिलोपार्जित असलेली 8 एकर शेती पैकी 2 एकर शेतीत स्वतः मेहनतीने 60 दिवस रात्रंदिवस वन्यजीवापासून रक्षण करून कोथिंबीर पिकविली. कोथिंबीरची मागणी वाढती आहे, याच बाबीवर लक्ष देत या पदवीधारक युवा शेतकऱ्याने आपल्या कुटुंबाच्या व पत्नी शारदा यांच्या मदतीने कोथिंबीर शेती फुलविली. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात ही शेती चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे शिक्षण हे नोकरी लागण्यासाठीच नसून तर ते शेतीला वेगळ्या पद्धतीने फुलविण्यासाठी सुद्धा वापरता येते, असे मत संदीप यांनी दैनिक नवराष्ट्रशी बोलताना व्यक्त केले.

    कोथिंबीरसाठी लागलेला कालावधी ६० दिवसांचा
    आलेला एकूण खर्च 20,000 हजार रुपये
    अपेक्षित उत्पन्न 1,00000 लाख

    मी पारंपरिक शेतीला फाटा देत कोथिंबीर पिक घेतले आहे. मार्केटमध्ये भाव चढता झाल्यास नक्कीच फायदा होईल. त्यामुळे नोकरी न लागत असलेल्या युवकांनी नैराश्यात न राहता शेतीकडे वळावे.
    — संदीप दारोकार, पदवीधारक युवा शेतकरी अटकळी