अकोल्यात भाजपकडून विजबिलांची होळी
अकोल्यात भाजपकडून विजबिलांची होळी

वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्यावर दरवाढ लादणा-या महाविकास आघाडी शासनाचा भाजपकडून निषेध करण्यात आला. जिल्ह्यात ८३ ठिकाणी आंदोलन करण्यात आले. १७,४२५ कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, अकोलाच्या महापौर अर्चना मसने, माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांच्या नेतृत्वात शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते ठिकठिकाणच्या आंदोलनात सामील होते.

  • अकोला जिल्ह्यात ८३ ठिकाणी आंदोलन
  • १७ हजारावर कार्यकर्त्यांचा सहभाग

अकोला (Akola).  वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्यावर दरवाढ लादणा-या महाविकास आघाडी शासनाचा भाजपकडून निषेध करण्यात आला. जिल्ह्यात ८३ ठिकाणी आंदोलन करण्यात आले. १७,४२५ कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, अकोलाच्या महापौर अर्चना मसने, माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांच्या नेतृत्वात शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते ठिकठिकाणच्या आंदोलनात सामील होते.

वीज दरवाढ करुन राज्य सरकार जनतेची लूट करीत आहे. आधीच संकटाचा सामना करीत असलेल्या नागरिकांवर पठाणी बोजा वीज बिलांद्वारे सरकारने टाकला आहे, असा आरोप आ. रणधीर सावरकर यांनी केला. सरकार चालवता की सावकारी करता असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. ठाकरे सरकारला जनभावनेची कदर नसून केवळ गप्पांचा बाजार मांडल्याचा आरोप ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी केला. विजय अग्रवाल म्हणाले,सर्वसामान्य नागरिक त्रस्त असून निराधारांना मदत करण्याऐवजी त्यांच्यावर आर्थिक बोजा लादणे सरकारला शोभत नाही.

प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात यांच्या नेतृत्वात कापशी येथे आंदोलन झाले. तालुका भाजपच्या वतीने तालुकाध्यक्ष अंबादास उमाळे, रवी गावंडे, राजेश ठाकरे, डॉ.राजेश यादव, सिध्दूभाऊ लोणकर, कन्हैया यादव, देवीदास खाकरे, मोरे,शे.शब्बीर, संजय केवट, हरिपाल केवट, फकिरा मोकळकर, तुकाराम शिंदे, सहदेव शिंदे, वेणू उमाळे, उषा मोरखडे,बाळूभाऊ फेंड,सागर डिवरे यांनी आंदोलनात भाग घेतला.

हिवरखेडला वीज बिल होळी
हिवरखेड: येथील आंदोलनात डॉ.राम तिडके, रमेश दुतोंडे, बाळासाहेब नेरकर, किरण सेदानी, महेंद्र भोपळे, विनोद ढबाले, अनिल कराळे, प्रवीण येऊल, रवी मानकर यांच्या नेतृत्वात वीज बिल होळी करण्यात आली. यावेळी अकेश पंचबुधे, अंकुश हिवराळे, राहुल इंगोले, गजानन राठोड, सुलभा दुतोंडे, गोकुळा भोपळे, प्रतिभा येऊल, उज्वला नेरकर, पंचबुधेताई, विजया कराळे, दिलीप नाठे, बजरंग तिडके, नंदू शिंदपुरे, विनोद ढबाले, योगेश येऊल, शंकर घावट, रमेश सोनोने, दत्ता कुलकर्णी, किसन पांडे, गजानन भटकर सामील झाले होते.

गांधीग्रामला डॉ. किरण ठाकरे, मणिराम टाले, गणेश लोड, हिंमत देशमुख, प्रकाश फुरसुले, नंदू राठोर, राजेंद्र ठाकरे, नंदू मांजरे, गोलू फुरसुले, संजय वानखडे, अभय मांजरे, अभिलाप मोरे, किरण खारोडे, नाना वाकोडे, संतोष कराळे, केशव खारोडे, दिलीप मोरे, अनंता खारोडे, महादेव ठाकरे, अशोक काठोळे व कार्यकर्त्यांनी वीज बिलांची होळी केली.