महिलेच्या घरातून अवैध दारु जप्त

अकोला (Akola).  शहरातील स्थानिक अन्नाभाऊ साठे नगरमध्ये पोलिसांनी महिला आरोपी सुनीता बल्लाड हिच्या घरावर छापा टाकून अवैध दारु जप्त केली आहे. यामध्ये १४४ नग दारुच्या बाटलांचा समावेश असून अंदाजे किंमत ७९२० रुपये वर्तविली जात आहे. पोलिसांनी महिलेविरुद्ध प्रकरण नोंदविले आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम आणि आकोट फैलचे ठाणेदार महेंद्र कदम, पोलिस उपनिरीक्षक प्रतिभा मेश्राम, हेड काॅन्स्टेबल सुनील टोपकर, पोलिस काॅन्स्टेबल शेख असलम, संजय पांडे आणि दिलीप इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.