corona

अकोला (Akola).  आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 170 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 137 अहवाल निगेटीव्ह तर 33 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच प्रमाणे काल (दि.12) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 13 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7,866 झाली आहे.

अकोला (Akola).  आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 170 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 137 अहवाल निगेटीव्ह तर 33 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच प्रमाणे काल (दि.12) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 13 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7,866 झाली आहे. आज दिवसभरात 47 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 40,702 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 39,665 फेरतपासणीचे 208 तर वैद्यकीय कर्मचा-यांचे 829 नमुने होते. आजपर्यंत एकूण 40,618 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 34,242 तर पॉझिटीव्ह अहवाल 7866 आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 33 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 33 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. त्यातील रामदासपेठ येथील तीन जण, तर उर्वरित मोठी उमरी, गौरक्षण रोड, सिंधी कॅम्प, जिल्हा परिषद कॉलनी व खडकी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी 25 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आठ महिला व 17 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील माना, मोठी उमरी व अधिकारी निवास सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन जण, मुर्तिजापूर व शिवर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित बार्शीटाकळी, जउळका, तेल्हारा, सावरगाव, शिर्ला, फडके नगर, देवराव बाबा चाळ, लहान उमरी, गिता नगर, वृंदावन नगर, तळेगाव बाजार व हिरवखेड येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 13 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

47 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 31 जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून चार जण, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, ओझोन हॉस्पीटल येथून चार जण, सुर्यचंद्रा हॉस्पीटल येथून तीन, तर हॉटेल रिजेन्सी येथून एक जणांना अशा एकूण 47 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

चौघांचा मृत्यू
दरम्यान आज चार जणांचा मृत्यू झाला. त्यात खडकी खदान येथील 64 वर्षीय पुरुष असून ते 12 ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, सिव्हील लाईन येथील 30 वर्षीय महिला असून ती 5 ऑक्टोंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला, बार्शीटाकळी येथील 56 वर्षीय पुरुष असून ते 9 ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, तर कापशी ता. पातूर येथील 54 वर्षीय पुरुष असून ते 10 ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.

379 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 7,866 आहे. त्यातील 260 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 7,227 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 379 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.