प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या कारभाराची नियमित पाहणी अमरावती येथील विभागीय आयुक्तांच्या पथकाकडून सुरु करण्यात आली असून, शुक्रवारी दिवसभरात कृषी विभागातील दस्तावेजांची पाहणी करुन या पथकाने त्याच्या नोंदी घेतल्या. 

  • जि.प. च्या कारभाराची २ डिसेंबरपर्यंत झाडाझडती

अकोला (Akola). मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या कारभाराची नियमित पाहणी अमरावती येथील विभागीय आयुक्तांच्या पथकाकडून सुरु करण्यात आली असून, शुक्रवारी दिवसभरात कृषी विभागातील दस्तावेजांची पाहणी करुन या पथकाने त्याच्या नोंदी घेतल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या ६ जणांच्या पथकाने जिल्हा परिषदेतील विविध विभागांच्या पाहणीला सुरूवात केली आहे. पथकाने विभाग निहाय पाहणीचे वेळापत्रकही तयार केले आहे. त्यानुसार शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी कृषि विभागाची पाहणी करण्यात आली. २१ व २२ रोजी शनिवार व रविवारी सुटी असल्याने पाहणी होणार नसून सोमवार २३ नोव्हेंबर रोजी समाज कल्याण आणि पशुसंवर्धन विभागाची पाहणी होणार आहे.

मंगळवार २४ नोव्हेंबर रोजी महिला व बाल कल्याण आणि पंचायत विभाग, २५ नोव्हेंबर रोजी अर्थ विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, २६ नोव्हेंबर रोजी शिक्षण, २७ नोव्हेंबर रोजी बांधकाम, ग्रामीण बांधकाम विभाग, १ डिसेंबर रोजी जि.प. हायस्कूल, सामान्य प्रशासन आणि २ डिसेंबर रोजी लघुसिंचन विभागाची पाहणी होणार असून, ३ डिसेंबर रोजी संकलनाचे काम होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.