अटक करण्यात आलेल्या चोरांच्या टोळीसह पोलिस टीम
अटक करण्यात आलेल्या चोरांच्या टोळीसह पोलिस टीम

  • वर्धेतील सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या पोलिसांची कारवाई

अकोला (Akola) : चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीने अकोल्यात एक गोडाऊन फोडले होते. त्यातून चोरट्यांनी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गोडाऊनमधून तब्बल १६ लाख ८० हजार रुपयांच्या सिगारेटसह मुद्देमाल पळविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. चोरट्यांच्या टोळीने राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेशात मोठ्या चोऱ्या केल्याचे समोर आले आहे. हे चोरटे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते. चोरी प्रकरणी गोडावून मालकाने दिलेल्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंविच्या कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांना या चोरट्यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी एक महिन्यापासून या चोरट्यांवर पाळत ठेवली आणि अखेर त्यांना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून ताब्यात घेतले. यामध्ये अकबर खान ऊर्फ अवघड चोरवा हबीब खान, सय्यद हुसेन उर्फ सोनू सय्यद हबीब, व जुममन शाह सुलेमान शाह, तिघेही राहणार मालेगाव, जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.