मनपामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मास्क लावणे बंधनकारक

  • मनपा उपायुक्त वैभव आवारे यांची सूचना

अकोला (Akola):   जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता फैलाव चिंतेची बाब बनला असून, शहरात हा प्रसार थांबावा यासाठी मनपा प्रयत्न करीत आहे, मात्र यात नागरिकांचेही सहकार्य महत्वाचे आहे. इतरांच्या आरोग्यासाठी तरी किमान मनपात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क, रुमाला बांधवा, फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे, असे आवाहन उपायुक्त वैभव आवारे यांनी केले असून, मनपात येणाऱ्यांना मास्क, रुमाल बांधूनच यावे, अशी विनंती, आवाहन करावे, अशी सूचनाही आवारे यांनी सुरक्षा रक्षकांना दिली आहे.

मनपामध्ये विविध कामांसाठी नागरिक येत असतात. नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासह त्यांचे कार्यकर्तेही येत असतात. त्यामुळे येथे गर्दी होते. कोरोनाचा उद्रेक वाढल्याने मास्क, रुमाल बांधावा, असे आवाहन केले जात आहे. परंतु याकडे अनेक नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. नगरसेवक, कर्मचारीही मास्क न लावता येतात. त्याची गंभीर दखल घेत, महापालिकेचे उपायुक्त वैभव आवारे यांनी प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकांना मनपामध्ये येणाऱ्या नागरिकांना मास्क, रुमाल बांधा, अशी विनंती करावी, अशी सूचना केली.