काटेपूर्णा अभयारण्याने टाकली कात ! अजूनही काही विकासात्मक कामे लवकरच मूर्त स्वरूप धारण करणार

जिल्ह्याची शान असणा़ऱ्या काटेपूर्णा अभयारण्याने आता कात टाकली असून, गेल्या चार ते पाच वर्षांच्या कालावधीत येथे करण्यात आलेल्या विकासात्मक कामांमुळे काटेपूर्णा अभयारण्याला आता पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. दरम्यान, अजूनही काही विकासात्मक कामे लवकरच मूर्त स्वरूप धारण करणार असल्याची माहिती अकोला वन्यजीव विभागाच्या सू्त्रांनी दैनिक नवराष्ट्रसोबत बोलताना दिली.

  रूबेन वाळके
  अकोला (Akola).  जिल्ह्याची शान असणा़ऱ्या काटेपूर्णा अभयारण्याने आता कात टाकली असून, गेल्या चार ते पाच वर्षांच्या कालावधीत येथे करण्यात आलेल्या विकासात्मक कामांमुळे काटेपूर्णा अभयारण्याला आता पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. दरम्यान, अजूनही काही विकासात्मक कामे लवकरच मूर्त स्वरूप धारण करणार असल्याची माहिती अकोला वन्यजीव विभागाच्या सू्त्रांनी दैनिक नवराष्ट्रसोबत बोलताना दिली.

  काटेपूर्णा अभयारण्य आता पर्यटनस्थळ झाले आहे. या अभयारण्यात अगोदर ‘टूरिझम’ साठी आवश्यक असणारे रस्ते नव्हते; मात्र गेल्या चार वर्षांच्या काळात ‘टूरिझम’साठीचे तब्बल २० किलोमीटरचे नवीन रस्ते तयार करण्याची कामे युद्धपातळीवर करण्यात आली. या रस्त्यांवर २० पानवटी तयार करण्यात आल्या आहेत. ‘टूरिस्ट’च्या वापराचे हेच रस्ते रात्री या अभयारण्यातील वन्यजीव संचारासाठी वापरतात.या परिसरात २० खाटांची सोय असलेल्या दोन ‘डॉरमिन्ट्री’ उभारण्यात आल्या असून, त्यामध्ये अटॅच बाथरुमचीही सोय करण्यात आली आहे.

  त्यासोबतच ३ ‘इकोहट‘ ही पर्यटकांच्या सोयीसाठी बांधण्यात आल्या असून, त्यापैकी २ जनरल आणि एक व्हीआयपी दर्जाची आहे. पर्यटकांच्या निवासासाठी उभारण्यात आलेल्या या निवासस्थानांचे ऑनलाईन आणि स्पॉट बुकिंगही करता येते. ‘जनरल‘साठी ५०० रुपये तर ‘व्हीआयपी‘साठी १ हजार रुपये एवढे चार्जेस आकारण्यात येतात. पर्यटकांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आरओ मशीन लावून करण्यात आली आहे. या अभयारण्याच्या क्षेत्रात येणाऱ्या तलावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मासेमारीचा व्यवसाय सुरु होता; मात्र आता तेथील मासेमारी थांबवून पर्यटकांसाठी बोटिंग’ही सुरु करण्यात बाली आहे. त्यासाठी मोटारबोटही खरेदी करण्यात आली आहे.

  अभयारण्याच्या विकासात्मक कामांना गती देण्यासाठी ‘व्हिलेज इको डेव्हलपमेंट कमिटी’ या शासकीय समितीची स्थापना करण्यात आली असून, समितीमार्फत पर्यटकांच्या खानपानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. अभयारण्याच्या परिक्षेत्रात येणाNया धोतरखेड, वाघा आणि कासमार या तीन गावांच्या विकासासाठीचा ‘मायक्राप्लान’ तयार करण्यात आला असून, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करणारी ‘डॉरमिन्ट्री’ आहेच सोबतच पर्यटकांसाठी ‘टू आणि फोर व्हिलर’ तसेच मोठ्या वाहनांसाठीही शेड उभारण्यात आली आहे.

  पर्यटकांची अर्थात टूरिस्टची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांना अभयारण्याची माहिती देण्यासाठी लगतच्या फेट्रा गावातील तरुणांना प्रशिक्षित करुन त्यांना ३०० रुपये दररोज याप्रमाणे रोजगार उपलव्य करुन देण्यात आला आहे. सध्या १२ प्रशिक्षित गाईड तेथे सेवा देत आहेत. ‘टूरिझम’ वाढल्यास या गावांमधील लोकांना जिप्सी वाहन घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

  अभयारण्यात ‘पॅगोडा‘ आणि आणखी एक उंच ‘वॉच टॉवर’ उभारण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. याठिकाणी गेट आणि बॅरिकेटस टाकून पर्यटकांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करण्यात आली असून, गाईन डेव्हलपमेंंटचेही काम सुरु आहे. बागेत लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी आणि सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सोबतच निसर्ग परिचय केंद्राचेही काम पूर्ण झाले आहे. पूर्वी या भागात वीज नव्हती; मात्र आता वीजही आली असून, तलावालगतच एक विहीरही खोदण्यात आली आहे. आता काटेपूर्णा अभयारण्य हे सर्वार्थाने पूर्णपणे पर्यटनस्थळ बनले असून, विदर्भातील पर्यटकांसाठी ही एक उत्तम पर्वणीच ठरणार आहे. काटेपूर्णा अभयारण्य अकोल्यापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असून तेथे रस्त्याच्या मार्गाने अध्र्या तासाामध्ये पोहोचता येते.