आकोट वन्यजीव विभागाकडून पकडण्यात आलेले दोन मांडूळ साप तस्कर
आकोट वन्यजीव विभागाकडून पकडण्यात आलेले दोन मांडूळ साप तस्कर

आकोट (Aakot) :  अकोला जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत अकोट वन्यजीव विभागामधील हिवरखेड या ठिकाणी मांडूळ या सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावतीच्या सायबर क्राईम सेलला मौजे जळगाव जवळील व्यक्ती दोन तोंडी साप (मांडूळ) या सापाची तस्करी करुन विक्रीच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मिळाली.

आकोट (Aakot) :  अकोला जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत अकोट वन्यजीव विभागामधील हिवरखेड या ठिकाणी मांडूळ या सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावतीच्या सायबर क्राईम सेलला मौजे जळगाव जवळील व्यक्ती दोन तोंडी साप (मांडूळ) या सापाची तस्करी करुन विक्रीच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार येथील सेलचे अधिकारी आणि अकोट वन्यजीव विभागामधील अधिकारी यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.

हिवरखेड येथील इसार पेट्रोल पंपाजवळ रचलेल्या सापळ्यामध्ये आरोपी अमोल महादेव हिवराळे आणि लक्ष्मण राजू खिरोळकर दोघेही रा. वडोदा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव हे अडकले. घटनास्थळावरुन त्यांच्याकडून मांडूळ या प्रजातीचा साप आणि तीन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. मांडूळ तस्करी प्रकरणातील इतर आरोपी अंधाराचा फायदा घेवून पसार झाले. दोन्ही आरोपींना प्रथमश्रेणी न्यायालयाने वनकोठडी सुनावली आहे.